advertisement

450 कोटींचा चुराडा अन् 3.3 रेटिंग! 2026 ची महाडिजास्टर फिल्म OTT वर येताच बनली ट्रेंडिग, तुम्ही पाहिली का?

Last Updated:
OTT Trending Movie 2026: थिएटर्समध्ये प्रेक्षकांनी नाकारलेला हा सिनेमा आता ओटीटीवर मात्र नवा विक्रम रचत आहे. या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला.
1/10
सिनेविश्वात कधी काय होईल याचा नेम नसतो. कधी एखादा छोटा सिनेमा कोट्यवधींची कमाई करतो, तर कधी बड्या सुपरस्टार्सचे मेगा बजेट सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटतात.

2/10
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याच्या 'द राजा साब' या ४०० ते ४५० कोटी रुपयांचे अवाढव्य बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम २०८ कोटींची कमाई केली आणि त्याला डिझास्टर घोषित करण्यात आले.

3/10
पण थिएटर्समध्ये प्रेक्षकांनी नाकारलेला हा सिनेमा आता ओटीटीवर मात्र नवा विक्रम रचत आहे. ९ जानेवारी २०२६ रोजी पोंगलच्या मुहूर्तावर 'द राजा साब' मोठ्या थाटामाटात रिलीज झाला.

4/10
प्रभाससोबत संजय दत्त, मालविका मोहनन आणि निधी अगरवाल अशी तगडी स्टारकास्ट होती. हॉरर-कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या, पण सिनेमा पाहिल्यानंतर चाहत्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला.

5/10
IMDb वर या सिनेमाला १० पैकी अवघं ३.३ रेटिंग मिळालं आहे, जे एखाद्या सुपरस्टारसाठी लाजिरवाणं मानलं जातं. मात्र, ६ फेब्रुवारीला हा सिनेमा 'जिओ हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला आणि ६ मार्चला त्याची हिंदी आवृत्ती आली.

6/10
आश्चर्य म्हणजे, थिएटर्समध्ये न चाललेला हा सिनेमा ओटीटीवर सध्या नंबर १ वर ट्रेंड करत आहे. घरात बसून हा सिनेमा पाहताना प्रेक्षकांना तो आवडत असल्याचं चित्र दिसत आहे.

7/10
जेव्हा सोशल मीडियावर या सिनेमाला फ्लॉप म्हणून ट्रोल केले जाऊ लागले, तेव्हा दिग्दर्शक मारुती यांचा संयम सुटला. त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांनाच खडे बोल सुनावले.

8/10
 "माझ्या सिनेमाला फ्लॉप म्हणू नका," असा दम भरत त्यांनी या अपयशाचे खापर प्रेक्षकांच्या आकलनशक्तीवर फोडले. मारुती यांच्या मते, हा सिनेमा अनेक स्तरांवर बनवला आहे, पण प्रेक्षकांनी सणासुदीच्या काळात त्याला केवळ टाइमपास म्हणून पाहिलं आणि सिनेमातली खोली त्यांना समजलीच नाही.

9/10
रिलीजपूर्वी मारुतींनी दावा केला होता की, हा भारतीय सिनेमातील एक मास्टरपीस ठरेल. मात्र, बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीने आणि IMDb च्या रेटिंगने त्यांच्या या दाव्यातील हवाच काढून घेतली.

10/10
'बाहुबली'नंतर प्रभासच्या एकाही सिनेमाला तसं निर्भेळ यश मिळालेलं नाही. 'साहो', 'राधे श्याम', 'आदिपुरुष' आणि आता 'द राजा साब' या सलगच्या अपयशामुळे प्रभासच्या करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ओटीटीवर यश मिळत असलं तरी, ४५० कोटींच्या सिनेमाला थिएटर्समध्ये प्रेक्षक खेचता आले नाहीत.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement