T20 World Cup : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कोचचा राजीनामा, नवी जबाबदारी स्विकारली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कोचने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यासह त्याने दुसऱ्याच क्षणी त्याने मोठी जबाबदारी स्विकारली आहे.
Gary Kirsten Appointed as Sri Lanka New Head Coach : टी20 वर्ल्ड कप टीम इंडियाने नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा वर्ल्डकप नाव कोरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.त्याचसोबत सलग दोनदा वर्ल्ड कप आणि यजमान म्हणून पहिला वर्ल्डकप जिंकण्याची किमया देखील भारताने साधली होती. या विजयानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कोचने राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यासह त्याने दुसऱ्याच क्षणी त्याने मोठी जबाबदारी स्विकारली आहे.
टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात अनेक कोचने मोलाची भूमिका बजावली होती. यापैकी एक असलेल्या कोचने आता राजीनामा दिला आहे. तसेच त्याने लगेचच नवीन जबाबदारी देखीव स्विकारली आहे. भारताचा हा कोच दुसरा तिसरा कुणी नसून माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्न आहे.गॅरी कर्स्टन हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये नामिबिया संघाचा प्रशिक्षक होता.पण वर्ल्ड कप संपताच त्याने राजीनामा दिला आहे.आणि श्रीलंका संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारली आहे.
advertisement
खरं तर टी20 वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या प्रशिक्षक पदी सनथ जयसूर्या होते. पण श्रीलंका वर्ल्डकप मधून बाहेर होताच जयसूर्या यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर श्रीलंकेच्या राष्ट्रीय पुरुष संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन यांची नियुक्ती जाहीर केली आहे. गॅरी कर्स्टन यांची 15 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान गॅरी कर्स्टन यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेसोबत उत्कृष्ट प्रशिक्षक कारकिर्दीचा आनंद घेतला आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 2011चा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. नंतर त्यांनी 2011 ते 2013 पर्यंत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद भूषवले होते. या काळात 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्व फॉरमॅटमध्ये नंबर 1 क्रमांकाचा संघ बनला होती.
गॅरी कर्स्टन वर्ल्ड कपमध्ये नामिबिया संघाचे प्रशिक्षक होते. पण वर्ल्डकप संपताच त्यांनी राजीनामा दिला होता.आता ते श्रीलंका संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहेत. दरम्यान यशस्वी प्रशिक्षक कारकिर्दीपूर्वी, कर्स्टन यांनी 1993 ते 2004 दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी एक प्रतिष्ठित खेळ कारकिर्दीचा आनंद घेतला. त्या काळात त्यांनी 21 कसोटी शतके आणि 13 एकदिवसीय शतकांसह 14000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या.
advertisement
त्यांची प्राथमिक जबाबदारी आता दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या 2027 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी श्रीलंकेची तयारी आणि मार्गदर्शन करणे असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 8:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कोचचा राजीनामा, नवी जबाबदारी स्विकारली








