Dhurandhar 2 Movie: रिलीजच्या आधीच 'धुरंदर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पेड प्रिमियरमध्ये केला करोडोंचा बिझनेस
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. रणवीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या आदल्या दिवशी रिलीज होणार आहे. पेड प्रिमियरमध्ये चित्रपटाने करोडोंचा बिझनेस केला आहे. फक्त देशातच नाही तर, परदेशातही चित्रपटाने जबरदस्त कमाई केलेली आहे.
advertisement
'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 19 मार्च रोजी रिलीज होत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून जोरदार ॲडव्हान्स बुकिंग सध्या सुरू आहे. फक्त भारतातच नाही तर, अमेरिकेतही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधून रणवीर सिंगच्या 'धुरंदर 2' ने किती कमाई केली आहे, जाणून घेऊया...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'धुरंदर 2' चित्रपटाने फर्स्ट विकेंडला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 15.68 कोटींची कमाई केलेली आहे. सॅकल्निकने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये 'धुरंदर 2' चित्रपटाने तब्बल 18 कोटींची कमाई केलेली आहे. 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणारा 'धुरंदर 2' चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.







