advertisement

Wildlife : मोर अत्यंत विषारी साप खाऊनही जिवंत कसा राहतो? 99 टक्के लोकांना माहित नसेल कारण

Last Updated:
पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचणारा आपला राष्ट्रीय पक्षी 'मोर' सर्वांनाच भुरळ घालतो. मोराचे सौंदर्य पाहून तो किती नाजूक आणि शांत असेल असं आपल्याला वाटतं. पण तुम्हाला माहितीये का, हा सुंदर पक्षी विषारी सापालाही कच्चा चावून खातो.
1/8
आपण माणसं बाहेरचं थोडं जरी उघडं किंवा शिळं अन्न खाल्लं, तर लगेच आजारी पडतो. पोट बिघडतं, ॲसिडिटी होते किंवा अल्सरसारखे त्रास सतावतात. थोडक्यात सांगायचं तर आपली पचनसंस्था खूपच नाजूक असते आणि आपण आरोग्याबाबत अत्यंत संवेदनशील असतो. पण निसर्गाची किमया काही औरच आहे.

2/8
पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचणारा आपला राष्ट्रीय पक्षी 'मोर' सर्वांनाच भुरळ घालतो. मोराचे सौंदर्य पाहून तो किती नाजूक आणि शांत असेल असं आपल्याला वाटतं. पण तुम्हाला माहितीये का, हा सुंदर पक्षी विषारी सापालाही कच्चा चावून खातो. आता साहजिकच तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, जे विष माणसाचा काही क्षणांत जीव घेऊ शकतं, तसेच एखाद्या प्राण्यालाही गार करु शकतं, तेच विष पोटात जाऊनही मोराला काहीच कसं होत नाही? चला तर मग, यामागील गुपित समजून घेऊया.

3/8
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, मोर हा एक सर्वाहारी पक्षी आहे. तो कीटक आणि धान्यांसोबतच अत्यंत घातक आणि विषारी सापांचीही अतिशय चपळाईने शिकार करतो. विषारी सापांना मारून खाल्ल्यानंतरही मोराच्या आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही, तो अगदी ठणठणीत राहतो. यावर ऑथेंटिक माहिती देण्यासाठी गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ वन्यजीवांवर अभ्यास करणारे तज्ज्ञ 'अभिषेक' यांनी यामागील विज्ञान उलगडले आहे.

4/8
तज्ज्ञ अभिषेक यांच्या मते, सापाच्या विषामध्ये मुख्यत्वे 'कॉम्प्लेक्स प्रोटीन' (Complex Protein) म्हणजेच गुंतागुंतीची प्रथिने असतात. या विषाचा खरा धोका तेव्हाच असतो, जेव्हा ते थेट आपल्या रक्तात मिसळतं. रक्तात मिसळल्यावर हे विष स्वतःचा घातक प्रभाव दाखवायला सुरुवात करतं आणि प्राणांतिक ठरतं.

5/8
पण इथेच निसर्गाची जादू दडलेली आहे. जर हे विष रक्तात न मिसळता थेट तोंडातून गिळले गेले, तर त्याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

6/8
मोर का वाचतो आणि माणसाला का धोका असतो?सापाचं विष पोटात गेल्यावर ते साध्या प्रथिनांप्रमाणे (Protein) मोठ्या आरामात पचून जातं. पण या प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाची अट असते. सापाची शिकार करताना किंवा ते विष गिळताना प्राणी किंवा पक्ष्याच्या तोंडात, अन्ननलिकेत किंवा पोटात कोणत्याही प्रकारची जखम (Cut) किंवा अल्सर (Ulcer) नसावा. म्हणजे विष रक्तात न मिसळता थेट पोटात जातं.

7/8
माणसांच्या बाबतीत सांगायचं तर, आपल्या तोंडात किंवा पोटात अल्सर किंवा छोट्या जखमा असणं ही अत्यंत सामान्य बाब आहे. त्यामुळे चुकूनही विष गिळल्यास ते त्या जखमेतून थेट रक्तात मिसळण्याची दाट शक्यता असते, जे प्राणघातक ठरते.मोर किंवा इतर काही वन्यजीवांच्या बाबतीत पोटात अल्सर किंवा जखमा असणं हे अत्यंत दुर्मिळ असतं.

8/8
थोडक्यात सांगायचे तर, मोराच्या पोटात अल्सर नसल्यामुळे सापाचे विष त्याच्या रक्तात न मिसळता थेट पचून जाते. हेच कारण आहे की, अत्यंत विषारी सापांना खाऊनही मोराच्या शरीरावर विषाचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही आणि तो पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त राहतो.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement