VIDEO : रोहितने सर्वांसमोर मैदानात ढकलले, फायनल नंतर वादावर कुलदीपने सोडलं मौन
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रोहित शर्माचा कुलदीप यादवला ढकलल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यामुळे दोघांमध्ये काय भांडण झालं की काय, अशी चर्चा रंगली होती.अखेर या सर्व घडामोडीवर कुलदीप यादवने मौन सोडलं आहे.
Kuldeep Yadav and Rohit Sharma : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी मैदानात तुफान जल्लोष केला. ट्रॉफी उंचावली आणि फोटोसेशनही केला. टीम इंडियाच्या या विजयात टी20 वर्ल्ड कपचा ब्रॅड अम्बेसेडर रोहित शर्मा देखील सामील झाला होता. यावेळी त्याने मैदानातील प्रत्येक खेळाडूची गळाभेट घेतली आणि त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान यआधी रोहित शर्माचा कुलदीप यादवला ढकलल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यामुळे दोघांमध्ये काय भांडण झालं की काय, अशी चर्चा रंगली होती.अखेर या सर्व घडामोडीवर कुलदीप यादवने मौन सोडलं आहे. दरम्यान तो घटनेवर काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर टीम इंडियाच्या वानखेडेवरील सेमी फायनल सामन्या दरम्यान ही घटना घडली होती. दुसरा सेमी फायनलचा सामना हा मुंबईत आणि टी20 वर्ल्डकपचा ब्रॅड अॅम्बेसेडर असल्याने रोहित शर्मा देखील वानखेडेवर उपस्थित होता. यावेळी तो आपल्या टीम इंडियातील सहकाऱ्यांना देखील भेटला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
advertisement
या दरम्यान रोहित शर्माची कुलदीप यादवने देखील भेट घेतली होती. कुलदीप आधीच मैदानात प्रॅक्टीस करत होता,त्यामुळे तो मैदानात घामाघूम झाला होता, त्यामुळे अशा घामाटलेल्या अवस्थेतही तो रोहितची गळाभेट करायला गेला होता.पण कुलदीप घामाघुम असल्याचे पाहून रोहित शर्माने त्याला 'ए चल हड...' असे म्हणत हाकललं आणि त्यानंतर हाताला लागलेला घाम त्याने पुसला. त्यानंतर दोघांमध्ये काहीशी चर्चा झाली आणि नंतर रोहित त्याला शेकहँड करून निघून गेला. पुढे रोहित शर्माने इतर दुसऱ्या खेळाडूंची देखील भेट घेतली होती.
advertisement
Kuldeep shared Why Rohit stopped him to hug. 👀 pic.twitter.com/mYAbmKuAm2
— Shikha (@Shikha_003) March 9, 2026
दरम्यान रोहित शर्मा आणि कुलदीप यादव यांच्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे रोहित शर्मा असा का वागला? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. त्यानंतर या घटनेवर आता कुलदीप यादवने मौन सोडलं आहे.
advertisement
मैदानातली ती घटना फक्त त्यासाठी घडली कारण मला खूप घाम आला होता. आणि त्याचं (रोहितच) म्हणणं होतं, आता मला जायचंय आणि तु माझ्या अंगाला घाम लावशील.त्यामुळे ही गोष्ट खूपच मजेशीर होती.त्याच आमच्यात कुठलाही वाद झाला नव्हता,असे कुलदीपने स्पष्ट केले.
रोहित भाईने मला नेहमीच सपोर्ट केला आहे. ते नेहमीच माझ्या पाठीशी असतात. जेव्हा मी खेळत नव्हतो तेव्हा ते देखील ते मला सपोर्ट करत होते. तुझी वेळ येईल, तु मेहनत करत रहा.त्यामुळे अपेक्षा सोडू नकोस पण असं होतं असतं. कधी कधी कॉम्बिनेशनमुळे संधी मिळत नाही,असे बोलून रोहितने मला सात्वन देण्याचा प्रयत्न केल्याचेही कुलदीपने सांगितले.
advertisement
दरम्यान मैदानावर रोहित शर्मा आणि कुलदीप यादवच एक वेगळं नातं आहे. रोहित शर्मा अनेकदा कुलदीप यादवला फटकारताना दिसला आहे. कारण कुलदीप यादवला प्रत्येक अपीलवर डिआरएस घ्यायचं असतं. हीच गोष्ट रोहितला पटत नसल्याने तो नेहमी कुलदीपची मैदानावर शाळा घेत असतो. विशेष म्हणजे रोहितच्या अशा वागण्याचं कुलदीपला अजिबात वाईट वाटत नाही.कारण तो म्हणतो रोहित शर्मा हा सिनिअर खेळाडू आहे.त्यामुळे त्याच्या बोलण्याच मला वाईट वाटत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 8:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : रोहितने सर्वांसमोर मैदानात ढकलले, फायनल नंतर वादावर कुलदीपने सोडलं मौन








