advertisement

Nashik: 'मार डालेंगे', हॉस्पिटलबाहेर टोळक्याची डॉक्टरांना मारहाण, पत्नीचा केला विनयभंग, हाच का नाशिक कायद्याचा किल्ला?

Last Updated:

तिघांनी मारहाण केल्यामुळे डॉक्टर कांडेकर हे आपल्याा हॉस्पिटलकडे धावत गेले. पण या आरोपींपैकी एकाने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला.

News18
News18
नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  निफाड तालुक्यातील सायखेडा इथं डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. एका टोळक्याने  किरकोळ कारणावरून डॉक्टराना मारहाण केली आणि त्यांच्या पत्नीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नाशिक पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यात सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.  डॉ. प्रशांत वसंत कांडेकर हे सायंकाळी सोनगावहून भेंडाळी रोडमार्गे सायखेड्यातील सिद्धीविनायक हॉस्पिटलकडे आपल्या ब्रिझा कारने जात होते.  त्यावेळी आरोपी सागर कापसे, ऋतिक कापसे आणि साहिल पटेल हे तिघे दुचााकीवरून जात होते. तिघांनी कांडेकर यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर तिघांनी कांडेकर यांच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
advertisement
तिघांनी मारहाण केल्यामुळे डॉक्टर कांडेकर हे आपल्याा हॉस्पिटलकडे धावत गेले. पण या आरोपींपैकी एकाने दगड उचलून त्यांच्या पाठीत मारला. बाहेर गोंधळ सुरू असल्याचा पाहून कांडेकर यांच्या पत्नी धावत आल्या. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण या टोळक्याने त्यांच्याही हुज्जत घातली. एवढंच नाहीतर एकाने त्यांचा हात धरुून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलबाहेर हैदोस घातल्यानंतर या टोळक्याने 'मार डालेंगे' असं म्हणत डॉक्टर कांडेकर यांच्याकडे २० हजार रुपये मागितले.
advertisement
स्थानिकांनी लोकांनी टोळक्याला पिटाळलं
कांडेकर यांच्या हॉस्पिटलबाहेर राडा सुरू असल्याचं पाहून स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. लोकांनी विरोध केल्यानंतर टोळक्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.  गोदाकाठ मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं डॉक्टरांसाठी रस्त्यावर उतरले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोनगाव–सायखेडा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच सायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच निफाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड यांनीही घटनास्थळी येत आंदोलकांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश आणि ऋतिक कापसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: 'मार डालेंगे', हॉस्पिटलबाहेर टोळक्याची डॉक्टरांना मारहाण, पत्नीचा केला विनयभंग, हाच का नाशिक कायद्याचा किल्ला?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement