advertisement

VIDEO : वर्ल्डकप जिंकला तरी कसलाच ॲडीड्यूट नाही,सगळे सेलीब्रेशन करत असताना विजयाचा खरा हिरो एकटाच बसला!

Last Updated:

टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो एकटाच बसला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

sanju samson TEAM INDIA
sanju samson TEAM INDIA
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप टीम इंडियाने नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा वर्ल्डकप नाव कोरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.त्याचसोबत सलग दोनदा वर्ल्ड कप आणि यजमान म्हणून पहिला वर्ल्डकप जिंकण्याची किमया देखील भारताने साधली होती.टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी मैदानात भन्नाट जल्लोष केला. खेळाडू मैदानात नाचले काय होते, फोटोसेशन काय केलंल. या दरम्यान टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो एकटाच बसला होता. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
खरं तर टीम इंडि्याच्या विजयानंतर खेळाडूंनी सेलीब्रेशन केलं. या सेलीब्रेशन नंतक ओपनिंग सेरेमनी पार पडली. या नंतर दोन्ही टीमना मेडल आणि पुरस्काराची घोषणा झाली. त्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव यांच्या हाती वर्ल्ड कप ट्रॉफी दिली होती. त्यानंतर खेळाडूंनी ट्रॉफी उंचावून सेलीब्रेशन केले होते. या सेलिब्रेशनंतर प्रत्येक खेळाडूंनी ट्रॉफी सोबत फोटो काढले होते.
advertisement
सेलीब्रेशन दरम्यान काही खेळाडू आपल्या बायको पोरांसोबत जल्लोष करत होते.तर काही खेळाडू आपआपल्या गर्लफ्रेंडसोबत मैदानात विजयाच आनंद लुटत होते. या सर्वांमध्ये संजू सॅमसन होता. पण नंतर तो पोडीअमवर एकटाच बसून होता, त्याच्या हातात ट्रॉफी देखील होती. यावरून हे कळतं इतका मोठा विजय मिळवून देखील त्याने मैदानात छपरीपणा केला नाही, मैदानात साधेपणाने त्याने जल्लोष केला.तसेच विजयानंतर त्याने अॅटीट्यूडही दाखवला नाही याउलट तो एका कोपऱ्यात शांत बसला होता. यावरून कळत संजू किती साधा आणि सरळ खेळाडू आहे,संजूचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
प्लेइंग इलेव्हनमध्ये संजूची एंन्ट्री कशी झाली?
खरं तर टी20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसन आऊट ऑफ फॉर्म होता. त्याच्या बॅटीतून धावाच निघत नव्हत्या.त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये संजूसोबत अभिषेक शर्माची देखील बॅट चालत नव्हती.त्यामुळे गंभीरने रिस्क घेऊन संजूला खेळवलं. आणि संजूने या संधीच सोन करत आपण काय लेव्हलचा खेळाडू आहे, हे दाखवून दिलं. विशेष म्हणजे टीम इंडियावर जेव्हा ग्रुप स्टेजमधून बाहेर होण्याच संकट होत,त्यावेळी संजूने वेस्ट इंडिजविरूद्ध 97 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.त्याच्या याच खेळीमुळे टीम इंडिया सेमी फायनलला गेली.
advertisement
त्यानंतर इंग्लंड विरूद्ध सेमी फायनल सामन्यातही 89 धावांची वादळी खेळी केली.या खेळीच्या भारताला इंग्लंड समोर 250 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवता आले. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड हारली.फायनल सामन्यात देखील संजूने 89 धावांची खेळी केली. यामुळे टीम इंडिया न्यूझीलंडसमोर 255 धावांचं लक्ष्य ठेवून होती.पण या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड 159 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताने 96 धावांनी सामान जिंकला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : वर्ल्डकप जिंकला तरी कसलाच ॲडीड्यूट नाही,सगळे सेलीब्रेशन करत असताना विजयाचा खरा हिरो एकटाच बसला!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement