advertisement

Tilak Varma : वर्ल्ड कप फायनलनंतर तिलकचं मैदानातलं कृत्य... प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं, अंगावर शहारा आणणारा Video

Last Updated:

लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने विश्वविक्रम केला आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाचा 96 रननी दणदणीत विजय झाला.

वर्ल्ड कप फायनलनंतर तिलकचं मैदानातलं कृत्य... प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं, अंगावर शहारा आणणारा Video
वर्ल्ड कप फायनलनंतर तिलकचं मैदानातलं कृत्य... प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं, अंगावर शहारा आणणारा Video
अहमदाबाद : लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने विश्वविक्रम केला आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये टीम इंडियाचा 96 रननी दणदणीत विजय झाला. लागोपाठ दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच ठरली आहे. याशिवाय घरच्या मैदानात टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा पहिला मानही भारतीय टीमला मिळाला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करून तब्बल 255 रनचा डोंगर उभारला, या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा 19 ओव्हरमध्ये फक्त 159 रनवर ऑलआऊट झाला.
पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. अहमदाबादच्या मैदानात भारतीय खेळाडूंनी तिरंगा घेऊन व्हिक्ट्री परेड केली आणि मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले. टीम इंडियाचा बॅटर तिलक वर्मा तिरंगा घेऊन मैदानात व्हिक्ट्री लॅप करत होता, तेव्हा तिरंगा मैदानात पडला. तिलकच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्याने लगेच तिरंगा उचलला आणि तो कपाळाला लावून माफीही मागितली. तिलक वर्माचा हा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्याच्या कृतीचं चाहते कौतुक करत आहेत.
advertisement
advertisement

तिलक वर्माचं कमबॅक

टी-20 वर्ल्ड कपच्या आधी तिलक वर्मावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर वर्ल्ड कपच्या सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये तिलक वर्मा संघर्ष करत होता, अखेर टीम मॅनेजमेंटने तिलकला खालच्या फळीत बॅटिंगला पाठवलं यानंतर त्याने धमाका केला. तिलकने 8 इनिंगमध्ये 28.42 च्या सरासरीने आणि 155.46 च्या स्ट्राईक रेटने 199 रन केले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Tilak Varma : वर्ल्ड कप फायनलनंतर तिलकचं मैदानातलं कृत्य... प्रत्येक भारतीयाचं मन जिंकलं, अंगावर शहारा आणणारा Video
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement