advertisement

42 वर्षांच्या शिक्षकाने 22 वर्षांच्या विद्यार्थिनीशी केलं दुसरं लग्न? स्विमिंग पूलमधील त्या व्हायरल फोटोमागचं सत्य अखेर समोर

Last Updated:

गुरु-शिष्याचं नातं आणि दुसरं लग्न अशा चवीने चघळल्या जाणाऱ्या विषयामुळे ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरत आहे. पण, जे दिसतंय ते खरंच सत्य आहे का? की हा केवळ इंटरनेटवरचा एक खोडसाळपणा आहे? चला, या व्हायरल दाव्यामागचं वास्तव काय आहे ते सविस्तर पाहूया.

viral photo fact check
viral photo fact check
मुंबई : सोशल मीडिया हे असं अजब जग आहे जिथे रोज सकाळी उठल्यावर काहीतरी नवीन, धक्कादायक किंवा विचित्र पाहायला मिळतंच. कधी एखादा डान्स व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी अशा काही फोटोंची चर्चा रंगते की पाहणारा क्षणभर चक्रावून जातो. सध्या फेसबुक आणि 'X' (ट्विटर) वर अशाच एका फोटोने धुमाकूळ घातला आहे. गुरु-शिष्याचं नातं आणि दुसरं लग्न अशा चवीने चघळल्या जाणाऱ्या विषयामुळे ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरत आहे. पण, जे दिसतंय ते खरंच सत्य आहे का? की हा केवळ इंटरनेटवरचा एक खोडसाळपणा आहे? चला, या व्हायरल दाव्यामागचं वास्तव काय आहे ते सविस्तर पाहूया.
नक्की काय आहे हा व्हायरल दावा?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड शेअर केला जात आहे. या फोटोसोबत असा दावा केला जात आहे की, एका 42 वर्षीय शिक्षकाने (मास्टरजी) आपल्याच शाळेत शिकणाऱ्या 22 वर्षांच्या विद्यार्थिनीशी दुसरं लग्न केलं आहे. इतकंच नाही, तर या मास्टरजींच्या पहिल्या पत्नीलाही या लग्नाबद्दल कोणतीही हरकत नसल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा दावा वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
व्हायरल फोटोमध्ये काय दिसत आहे?
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि एक लहान बाळ स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. या फोटोवर मजेशीर कॅप्शन देत लिहिलंय, हे आहेत 42 वर्षांचे मास्टरजी, ज्यांनी आपल्याच शाळेतील 22 वर्षांच्या विद्यार्थिनीशी दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीलाही याची काहीच अडचण नाहीये.
advertisement
पुढं उपरोधिकपणे असंही लिहिलंय की, आम्हाला वाटतं आम्ही फक्त रांगेत उभा राहण्यासाठी आणि जनगणना वाढवण्यासाठीच जन्माला आलो आहोत. खरं आयुष्य तर हे मास्टरजी जगत आहेत. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कुणी विचारतंय, "मास्टरजी शाळेत सिलॅबस शिकवायला जातात की प्रेमाचे धडे द्यायला?", तर कुणी स्वतःच्या नशिबाला दोष देत आहे.
advertisement
advertisement
काय आहे या फोटोचं खरं सत्य?
जेव्हा या फोटोची सखोल चौकशी आणि 'फॅक्ट चेक' करण्यात आले, तेव्हा यातील धक्कादायक सत्य समोर आलं. या फोटोचा आणि त्यासोबतच्या कथेचा लांबलांबपर्यंत काहीच संबंध नाहीये. तपासणीत असं समोर आलं आहे की, हा फोटो मीम (Meme) बनवण्यासाठी जाणीवपूर्वक एडिट करण्यात आला आहे.
AI आणि एडिटिंगचा वापर: 'X' (ट्विटर) च्या ग्रोक (Grok) या AI टूलने दिलेल्या माहितीनुसार, या फोटोतील चेहऱ्यांचे हावभाव एडिटिंग टूल्स किंवा AI च्या मदतीने बदलण्यात आले आहेत. जेणेकरून तो फोटो अधिक चर्चेचा विषय ठरेल.
advertisement
फोटोतील व्यक्ती शिक्षक आहे किंवा त्यांनी विद्यार्थिनीशी लग्न केलं आहे, याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. ही केवळ सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी रचलेली एक काल्पनिक आणि खोटी कथा आहे.
सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अनेकदा साध्या कौटुंबिक फोटोंचा वापर करून अशा वावड्या उठवल्या जातात. त्यामुळे अशा अफवा शेअर करण्यापूर्वी त्याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
42 वर्षांच्या शिक्षकाने 22 वर्षांच्या विद्यार्थिनीशी केलं दुसरं लग्न? स्विमिंग पूलमधील त्या व्हायरल फोटोमागचं सत्य अखेर समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement