advertisement

Sangli: कोल्हापूरनंतर सांगली, सभापती निवडणुकीआधी शिवसेनेच्या सदस्याचं अपहरण, पोलिसांकडे तक्रार दाखल

Last Updated:

इंगळे यांचे अपहरण झाल्याच्या संशयाने नातेवाईकांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार सांगितली.

News18
News18
सांगली: कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आल्यानंतर आता  सांगली येथील मिरज पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वीच बुधगावातील सदस्याचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. बुधगाव येथील शिंदे शिवसेनेचे सदस्य पांडुरंग कृष्णा इंगळे यांचं सोमवारी सायंकाळी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नातेवाईक आले होते. या घटनेने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.
मिरज पंचायत समिती साठी सभापती निवडीपूर्वी सोमवारी दुपारच्या सुमारास बुधगाव-कवलापूर रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळून काही अज्ञात व्यक्तींनी पांडुरंग कृष्णा इंगळे (वय ६७, रा. बुधगाव) यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण इंगळे यांची दुचाकी पेट्रोल पंपाजवळ संशयास्पद अवस्थेत उभी आढळून आली आहे. त्यामुळे अपहरणाची शक्यता व्यक्त होत आहे.
advertisement
इंगळे यांचे अपहरण झाल्याच्या संशयाने नातेवाईकांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार सांगितली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. इंगळे यांचे खरोखरच अपहरण झाले आहे काय? याची खात्री करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
घटनास्थळी शिंदेसेनेचे नेते बजरंग पाटील, तानाजी पाटील आदी दाखल झाले. सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर इंगळे यांचे नातेवाईक रात्री ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर होते. इंगळे यांच्या मुलाने ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangli: कोल्हापूरनंतर सांगली, सभापती निवडणुकीआधी शिवसेनेच्या सदस्याचं अपहरण, पोलिसांकडे तक्रार दाखल
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement