Baba Vanga Prediction For 2026 : पुढच्या वर्षात काही खरं नाही! 2026 सालाबाबत बाबा वेंगांची 4 खतरनाक भविष्यवाणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Baba Vanga Prediction For 2026 Year : 2025 वर्ष संपून 2026 वर्ष सुरू व्हायला काही दिवसच उरले आहेत. 2025 तर कसंबसं गेलं आता 2026 वर्ष कसं असेल याची चिंता सगळ्यांना आहे. याचदरम्यान बाबा वेंगांची भविष्यवाणी व्हायरल झाली आहे. जी भयानक आहे.
प्रसिद्ध बल्गरियन भविष्यवेत्ता बाबा वेंगा ज्यांना बाल्कनची नास्त्रेदामस म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी शतकानुशतके घडणाऱ्या घटनांचं भाकीत केलं होतं. ज्यापैकी काही खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. 9/11 हल्ला, क्वीन डायनाचा मृत्यू आणि कोविड-19 साथीच्या आजारासारख्या घटनांसह तिच्या 85% भाकिते खरी ठरल्याचं वृत्त आहे. आता 2026 वर्ष जवळ येत असताना तिची भाकितं व्हायरल होत आहे.
advertisement
बाबा वेंगाच्या मते मार्च 2026 मध्ये एक मोठं जागतिक युद्ध सुरू होईल. जे रशिया आणि चीनसारख्या पूर्वेकडील देशांमधून सुरू होईल आणि अमेरिका आणि युरोपसारख्या पाश्चात्य देशांना नष्ट करेल. हे तिसरं महायुद्ध असेल, जे मर्यादित सीमा विवादांच्या पलीकडे जाईल आणि संपूर्ण खंडांवर परिणाम करेल. स्काय हिस्ट्री चॅनेलच्या अहवालानुसार, वेंगाने म्हटलं होतं, "पूर्व पश्चिमेकडील देशांचा नाश करेल आणि ही मानवतेच्या पतनाची सुरुवात असेल." अलिकडच्या युक्रेन-रशिया युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव लक्षात घेता अनेक तज्ज्ञ या भाकिताला प्रासंगिक मानतात. पण वेंगाने विशिष्ट तारखा किंवा ठिकाणं दिली नाहीत, म्हणून ती अर्थ लावण्याच्या अधीन आहे.
advertisement
वेंगाच्या भाकितानुसार एप्रिल-जूनपर्यंत भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि तीव्र हवामानामुळे पृथ्वीवरील 7-8% जमीन नष्ट होईल. इकॉनॉमिक टाईम्स आणि हिंदुस्तान टाईम्स सारख्या माध्यमांच्या वृत्तानुसार याचा संबंध कॅश क्रश म्हणजे आर्थिक मंदीशी जोडला गेला आहे, जिथं नैसर्गिक आपत्ती जागतिक अर्थव्यवस्था कोलमडून टाकतील. अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलिया-कॅनडामधील जंगलातील आग आणि म्यानमार भूकंप हे याचे पुरावे म्हणून पाहिले जात आहेत. पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हवामान बदलामुळे अशा घटना वाढत आहेत, पण 7-8% हा आकडा अतिशयोक्तीपूर्ण वाटतो.
advertisement
तंत्रज्ञानाच्या बाबतीत वेंगा इशारा देतात की 2026 मध्ये एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवांवर वर्चस्व गाजवेल. ही भविष्यवाणी चॅटजीपीटी आणि ऑटोमेशनसारख्या सध्याच्या एआय प्रगतीशी जुळते. तज्ज्ञांचा अंदाज आहे की 2026 पर्यंत, प्रयोगशाळेत वाढवलेले अवयव आणि न्यूरोटेक्नॉलॉजी एक मैलाचा दगड असेल, पण एआय कॅप्चर नैतिक दुविधा निर्माण करेल.
advertisement
सर्वात भयावह भाकित म्हणजे एलियन संपर्क. नोव्हेंबर-डिसेंबर 2026 मध्ये एक मोठं अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल, जो पहिला थेट एलियन संपर्क असेल. ही भविष्यवाणी अलीकडेच सापडलेल्या इंटरस्टेलर धूमकेतू 3I/ATLAS शी जोडलेली आहे. नासाच्या मते जुलै 2025 मध्ये चिलीमध्ये एटलास दुर्बिणीने शोधलेला हा धूमकेतू आपल्या सौर मंडळाच्या बाहेरून उद्भवला आहे. हा शोधलेला तिसरा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे. जरी नासा त्याला नैसर्गिक धूमकेतू मानतो. तरी हार्वर्डचे खगोलशास्त्रज्ञ एव्ही लोएब यांनी याला एलियन तंत्रज्ञानाचं लक्षण मानलं आहे.









