advertisement

593KM रेंजसह लवकरच येतेय नवी टाटा पंच EV फेसलिफ्ट! पाहा कधी होणार लॉन्च

Last Updated:
Tata Punch EV Facelift: टाटा मोटर्स लवकरच आपली नवी टाटा पंच ईव्ही फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. आज आपण या कारच्या डिटेल्सविषयी जाणून घेऊया.
1/7
भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक कारचा बोलबाला पाहायला मिळतोय. लोकंही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. दरम्यान टाटा मोटर्स भारतीय बाजारात 20 फेब्रुवारी 2026 रोजी आपली नवी पंच ईव्ही फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वी ही कार अनेकदा विना कव्हरसाठी टेस्टिंग दरम्यान दिसली आहे.

2/7
टेस्टिंग दरम्यान कव्हर नसल्यामुळे या कारची नवीन डिझाइन आणि बदल स्पष्ट दिसत आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ देखील शेअर केलाय. ज्यामध्ये कारची ड्रायव्हिंग रेंज दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय त्यानुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एकदा फूल चार्ज झाल्यावर जवळपास 593.6 किलोमीटरपर्यंत चालते.

3/7
बॅटरी आणि परफॉर्मन्समध्ये काय खास आहे? : नवीन टाटा पंच ईव्ही फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 25kWh आणि 35kWh क्षमतेच्या बॅटरी पॅक असण्याची शक्यता आहे. या दोन्ही बॅटरी फ्रंट इलेक्ट्रिक मोटरसह जोडल्या जाऊ शकतात. 25kWh व्हर्जनमध्ये 82 एचपी पॉवर आणि 114Nm टॉर्क निर्माण करते.

4/7
तसंच 35kWh बॅटरी पॅकसह 122hp ची पॉवर आणि 190Nm टॉर्क मिळते. सध्याच्या मॉडलमध्ये 25kWh बॅटरी रेंज 265 किलोमीटर आणि 35kWh ची रेंज  365 किलोमीटर आहे. मात्र सद्या झालेल्या रेंज टेस्ट नंतर कंपनी यामध्ये नेक्सन ईव्हीचा 45kWh बॅटरी पॅकही देऊ शकते अशा चर्चा आहेत. असं झाल्यास या कारची रेंज आणखी वाढू शकते.

5/7
डिझाइनमध्ये नवीन बदल : नवीन पंच ईव्ही फेसलिफ्टमध्ये त्याच्या बाह्य भागात काही बदल करण्यात आले आहेत. समोरचा बंपर पुन्हा डिझाइन करण्यात आला आहे आणि मागील काळा ट्रिम काढून टाकण्यात आला आहे. एअर डॅम आणि स्किड प्लेटमध्ये देखील थोडे बदल करण्यात आले आहेत. तसंच, वाय-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि सेंट्रल चार्जिंग फ्लॅप पहिल्यासारखेच राहिले आहेत.

6/7
साइडने पाहिल्यास, त्याचे स्वरूप फारसे बदललेले दिसत नाही, परंतु काही व्हेरिएंटमध्ये नवीन अलॉय व्हील्स मिळू शकतात. टेस्टिंग दरम्यान हे मॉडेल लाल ड्युअल-टोन रंगात आणि ब्लॅक रुफसह दिसते. कंपनी लवकरच ब्राउन आणि चमकदार पिवळ्यासारखे नवीन रंग जोडू शकते.

7/7
 मागील बाजूस आता पूर्ण-रुंदीचा एलईडी लाईट बार आणि नवीन बंपर डिझाइन आहे, ज्यामुळे ते अधिक आधुनिक आणि आकर्षक दिसते. नवीन पंच ईव्ही, त्याच्या आकर्षक डिझाइन आणि लांब रेंजसह, इलेक्ट्रिक कार बाजारात एक मजबूत आव्हान उभे करण्यास सज्ज आहे.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement