advertisement

Hardik Pandya : हार्दिक पांड्याने खेळ खराब केला, आयपीएल लिलावाआधी खतरनाक खेळाडूचा भाव कमी झाला!

Last Updated:

आयपीएल 2026 चा लिलाव 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे. या लिलावासाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं आहे.

हार्दिक पांड्याने खेळ खराब केला, आयपीएल लिलावाआधी खतरनाक खेळाडूचा भाव कमी झाला!
हार्दिक पांड्याने खेळ खराब केला, आयपीएल लिलावाआधी खतरनाक खेळाडूचा भाव कमी झाला!
मुंबई : आयपीएल 2026 चा लिलाव 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे. या लिलावासाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 खेळाडूंनी त्यांचं नाव नोंदवलं आहे. या 15 खेळाडूंपैकी एका खेळाडूचा खेळ हार्दिक पांड्याने खराब केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिकने या बॉलरची धुलाई केली आहे. लिलावाच्या आधीच हार्दिकने अशाप्रकारे आक्रमण केल्यामुळे 2 कोटींची बेस प्राईज असलेल्या या बॉलरला विकत कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर एनरिक नॉर्किया याने कटकमधल्या पहिल्या टी-20 सामन्यात दुखापतीनंतर पुनरागमन केलं आहे. जून 2024 नंतरचा नॉर्कियाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. पण त्याचं पुनरागमन अपेक्षेप्रमाणे झाले नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याने त्याला सर्वाधिक फटके मारले. तसंच नॉर्किया दक्षिण आफ्रिकेचा सगळ्यात महागडा बॉलर ठरला. एनरिक नॉर्कियाने 10.25 च्या इकोनॉमी रेटने 4 ओव्हरमध्ये 41 रन दिल्या. पांड्याने नॉर्कियाविरुद्ध 220 च्या स्ट्राईक रेटने 22 रन काढल्या.
advertisement

2 कोटींची बेस प्राईज

आयपीएल 2026 च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या नॉर्कियाने त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे. पण ज्या पद्धतीने त्याच्यावर आक्रमण केलं गेलं, ते पाहता फ्रँचायझींना त्याच्यात रस असण्याची शक्यता कमीच वाटते. पण लिलावाच्या आधी आणखी 2 सामने होणार आहेत, त्यामुळे नॉर्कियाला पुनरागमन करण्याची संधीही आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : हार्दिक पांड्याने खेळ खराब केला, आयपीएल लिलावाआधी खतरनाक खेळाडूचा भाव कमी झाला!
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement