16 आठवड्यांचा पगार घ्या आणि घरी जा, मार्च महिन्यातील सर्वात मोठी कर्मचारी कपात; 1,600 जणांची रातोरात नोकरी गेली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Layoff News: सॉफ्टवेअर कंपनी Atlassian ने AI क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेत जगभरातील 10 टक्के म्हणजेच जवळपास 1,600 कर्मचार्यांची कपात जाहीर केली आहे.
नवी दिल्ली: सॉफ्टवेअर कंपनी Atlassian ने आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचार्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास 1,600 नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कंपनी आपल्या कामकाजाचे पुनर्रचना (restructuring) करत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती द गार्डियनच्याअहवालातून समोर आली आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या पदावरील लोकांची नोकरी जाणार आहे त्यामध्ये 900 पेक्षा अधिक पदे सॉफ्टवेअर रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागातील आहेत. जून 2025 पर्यंत Atlassian कडे जगभरात 13,813 पूर्णवेळ कर्मचारी होते. यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी इंजिनिअरिंग आणि डिझाइन विभागात कार्यरत होते.
अनेक देशांतील कर्मचार्यांवर परिणाम
या कपातीचा परिणाम अनेक देशांतील कर्मचार्यांवर होणार आहे. कंपनीचे 640 कर्मचारी उत्तर अमेरिकेत कार्यरत आहेत, जवळपास 480 कर्मचारी ऑस्ट्रेलियात आहेत. तर 250 कर्मचारी भारतात आहेत. याशिवाय जपान, फिलिपिन्स, युरोप, मध्यपूर्व आणि आफ्रिका या ठिकाणी काही कर्मचार्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
advertisement
नेतृत्वात बदल आणि AI वर भर
Atlassian चे सहसंस्थापक Mike Cannon-Brookes यांनी कर्मचार्यांना पाठवलेल्या पत्रात सांगितले की, कंपनीसाठी हा निर्णय कठीण असला तरी भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यांनी लिहिले की हा निर्णय Atlassian साठी योग्य आहे. यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास आणि AI तसेच एंटरप्राइझ विक्री क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्यास मदत होईल. या पुनर्रचनेमुळे कंपनीच्या नेतृत्वातही काही बदल होणार आहेत. कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) Rajeev Rajan मार्च महिन्याच्या अखेरीस पद सोडणार आहेत. त्यांच्या जागी Taroon Mandhana आणि Vikram Rao हे संयुक्तपणे जबाबदारी सांभाळतील. कंपनीने त्यांना पुढील पिढीचे AI तज्ञ असे संबोधले आहे. माइक कॅनन-ब्रूक्स यांनी स्पष्ट केले की कंपनी AI च्या जागी थेट कर्मचारी ठेवत नाही, परंतु या तंत्रज्ञानामुळे कामगारांकडून अपेक्षित कौशल्यांचे स्वरूप बदलत आहे.
advertisement
बाजारातील दबाव आणि आर्थिक आव्हाने
Atlassian ची स्थापना Mike Cannon-Brookes आणि Scott Farquhar यांनी केली होती. मात्र 2026 च्या सुरुवातीपासून कंपनीचे बाजारमूल्य अर्ध्याहून अधिक घटले आहे. गुंतवणूकदारांना भीती आहे की AI तंत्रज्ञानामुळे कंपनीचा विद्यमान व्यवसाय मॉडेल धोक्यात येऊ शकतो. कंपनीची कमाई मुख्यतः सबस्क्रिप्शन आधारित सॉफ्टवेअर टूल्स मधून होते. 2025 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 1.6 अब्ज डॉलर महसूल नोंदवला. मात्र तरीही कंपनी नफ्यात नाही. त्या कालावधीत कंपनीला 42 दशलक्ष डॉलरचा निव्वळ तोटा झाला.
advertisement
गुंतवणूकदारांची सकारात्मक प्रतिक्रिया
नोकऱ्यांवरील गदा असूनही गुंतवणूकदारांनी या पुनर्रचना योजनेचे स्वागत केले आहे. या घोषणेनंतर Nasdaq शेअर बाजारातील व्यवहारात Atlassian च्या शेअरमध्ये सुमारे 4 टक्क्यांची वाढ झाली.
कामगार संघटनांची टीका
ऑस्ट्रेलियातील कामगार संघटना Professionals Australia ने या निर्णयावर टीका केली आहे. संघटनेचे संचालक Paul Inglis यांनी सांगितले की, अनेक कर्मचार्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नोकरी कपातीबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी म्हटले हे उच्च कौशल्य असलेले व्यावसायिक आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक उभी करण्यासाठी मोठा वाटा उचलला आहे. कर्मचार्यांना पारदर्शकता आणि योग्य सल्लामसलत मिळायला हवी होती.
advertisement
प्रभावित कर्मचार्यांना काय मिळणार?
नोकरी गमावणाऱ्या कर्मचार्यांना कंपनीकडून काही आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामध्ये किमान 16 आठवड्यांचे वेतन, आरोग्य विमा सुविधा वाढवून देणे, कंपनीचे लॅपटॉप परत केल्यानंतर 1,000 डॉलरचे तंत्रज्ञान भत्ता, तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये सुरू असलेला ट्रेंड, AI मध्ये गुंतवणूक वाढवत असताना अनेक तंत्रज्ञान कंपन्या कर्मचार्यांची संख्या कमी करत आहेत. उदाहरणार्थ: फिनटेक कंपनी Block (जिच्याकडे Afterpay आहे) ने अलीकडेच सुमारे 40 टक्के कर्मचार्यांची कपात केली. कंपनीचे सहसंस्थापक Jack Dorsey यांनी AI मुळे उत्पादकता वाढल्याचे कारण दिले. तसेच ऑस्ट्रेलियातील लॉजिस्टिक्स सॉफ्टवेअर कंपनी WiseTech Global नेही पुढील दोन वर्षांत सुमारे 2,000 नोकऱ्या कमी करण्याची योजना जाहीर केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 6:15 PM IST
मराठी बातम्या/मनी/
16 आठवड्यांचा पगार घ्या आणि घरी जा, मार्च महिन्यातील सर्वात मोठी कर्मचारी कपात; 1,600 जणांची रातोरात नोकरी गेली








