पिंपरीतील चौकात रस्त्यातच उभी होती कार; ना चालक, ना नंबरप्लेट, उडाला गोंधळ, शेवटी डिकीमध्ये...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सायंकाळच्या वेळी घरी जाणाऱ्या नोकरदार नागरिकांना या कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याच्या कडेला, अगदी वाहतुकीच्या मार्गातच ही कार उभी करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला
पिंपरी-चिंचवड: पिंपरी शहरातील वर्दळीच्या साई चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी चांगलाच गोंधळ उडाला. सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने केलेल्या बेजबाबदार पार्किंगमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. महत्त्वाचे म्हणजे, या वाहनाला नंबर प्लेटच नसल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या चालकावर नेमका दंड कसा आकारायचा, असा गंभीर प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर उभा राहिला होता.
advertisement
सायंकाळच्या वेळी घरी जाणाऱ्या नोकरदार नागरिकांना या कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रस्त्याच्या कडेला, अगदी वाहतुकीच्या मार्गातच ही कार उभी करण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडी झाली असतानाही मोटारीचा मालक बराच वेळ घटनास्थळी उपस्थित नव्हता, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.
advertisement
वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की, मोटारीला नंबर प्लेट नाही. नियमानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर ई-चलान किंवा दंड आकारण्यासाठी वाहनाचा नोंदणी क्रमांक आवश्यक असतो. विनानंबरप्लेट वाहन रस्त्यावर पार्क करणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, हे दोन्ही गंभीर गुन्हे असूनही मोटार कोणाच्या नावावर आहे, हे तातडीने शोधणे पोलिसांना शक्य झाले नाही.
advertisement
या घटनेनंतर काही वेळातच या वाहनाची नंबर प्लेट मागील डिकीमध्ये आढळून आली, अशी माहिती वाहतूक पोलीस सुप्रिया शिंदे यांनी दिली. नंबर प्लेट मिळाल्यानंतर संबंधित वाहनचालकास योग्य दंड आकारून त्याला समज देण्यात आली. मात्र, बेजबाबदार पार्किंग आणि नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 7:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरीतील चौकात रस्त्यातच उभी होती कार; ना चालक, ना नंबरप्लेट, उडाला गोंधळ, शेवटी डिकीमध्ये...








