Thane Crime: ठाण्यात पुन्हा रस्त्यावर लुटण्याचा प्रकार, एकाच दिवसात 2 घटना
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सध्या ठाणे शहरामध्ये सोनसाखळी चोरांची दहशत वाढली आहे. एकाच दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे.
ठाणेकरांना सावध करणारी बातमी समोर येत आहे, ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. सध्या शहरामध्ये सोनसाखळी चोरांची दहशत वाढली आहे. ठाण्यामध्ये एकाच दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरांची दहशत वाढली असून चोरांनी दोघांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचल्याचे प्रकार नुकतेच घडले आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या ठाणे पोलिसांकडून चोरांची कसून चौकशी केली जात आहे.
घडलेल्या पहिल्या घटनेमध्ये, तक्रारदार वसंत विहार परिसरात राहतात. शनिवारी (6 डिसेंबर) रात्री 10 वाजता मंदिरातून दर्शन घेऊन ते घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील 80 हजारांची 12 ग्रॅमची सोन्याची साखळी गळ्यातून खेचून पसार झाले. चोरांचं वय अंदाजे 24 ते 30 वर्षे इतके आहे. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागरिकांकडून लवकरात लवकर सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली जात आहे.
advertisement
त्याचदिवशी रात्री ढोकाळी येथेही चोरट्यांकडून एका व्यक्तीची सोन साखळी खेचण्याचा प्रकार घडला. तक्रारदार विक्रोळी येथे राहत असून काही कामानिमित्त ते शनिवारी ठाण्यात आले होते. रात्री पुन्हा 10:30 वाजता घरी जाण्यासाठी निघाले. ढोकाळी नाका येथून प्रभाग समिती मार्गे जात असताना दुचाकीवरील चोरांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांची सोन्याची साखळी खेचली. या प्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यामध्ये घडत असलेला प्रकार पाहून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परिसरातील नागरिकांकडून पोलिसांकडे लवकरात लवकर सोनसाखळी चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 09, 2025 9:50 PM IST











