द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी कधी? या दिवशी चुकूनही करू नका 'हे' एक काम, घरात येईल गरिबी; व्हाल कंगाल!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी' म्हटले जाते. भगवान गणेशाच्या 32 रूपांपैकी सहावे रूप असलेल्या 'द्विजप्रिय' गणेशाची या दिवशी पूजा केली जाते.
advertisement
advertisement
करू नका हे काम: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि विशेषतः घराबाहेर आलेल्या कोणत्याही गरजूला रिकाम्या हाती पाठवू नका. तसेच, या दिवशी 'तुळशीचे पान' गणपतीला अर्पण करू नका. शास्त्रानुसार, तुळशीने गणेशाला शाप दिला होता, त्यामुळे गणपती बाप्पाला तुळस अर्पण केल्याने घरात अशांती आणि गरिबी येते, असे मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
परोपकार आणि दान: या दिवशी शक्य असल्यास गरिबांना गुळ किंवा तीळ दान करावे. गरिबांचा तळतळाट घेतल्याने व्यक्ती कंगाल होऊ शकते, त्यामुळे त्यांच्याशी आदराने वागावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)







