Weather Alert: स्वेटर सोडा, आता रेनकोट घ्या! महाराष्ट्रावर अवकाळी ढग, 24 तास महत्त्वाचे, कुठं बरसणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 3 फेब्रुवारी रोजी काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> सध्या महाराष्ट्रातील हवामानात बदल सुरूच असून 2 फेब्रुवारीनंतरही वातावरण अस्थिरच राहिले. आज, 3 फेब्रुवारी 2026 रोजी हवामान विभागाने कोणताही महत्त्वाचा अलर्ट जारी केलेला नाही. तरीही राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. थंडी, उकाडा आणि ढगाळ वातावरण यांचा संमिश्र अनुभव आज पाहायला मिळणार आहे. राज्यातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
कोकण किनारपट्टीचा विचार करता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात आज हवामान संमिश्र राहणार आहे. सकाळच्या वेळेत काही भागांमध्ये थंड वातावरण जाणवेल, मात्र दुपारनंतर उकाडा वाढलेला दिसेल. आकाश ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता नाही. आज कोकणात कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण प्रामुख्याने राहणार आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात हवामानात फारसा बदल दिसणार नाही. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सकाळी आणि रात्री थंडी जाणवेल, तर दिवसा हवामान उबदार राहील. या भागांमध्ये आज कमाल तापमान 31 ते 33 अंश, तर किमान तापमान 17 ते 19 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात आज ढगाळ वातावरण राहणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड परिसरात थंडीचा प्रभाव कमी झालेला जाणवेल. विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ भागात हवामान कोरडे असले तरी ढगाळ स्थिती राहील. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात हलक्या सरी पडणार असल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. या भागांमध्ये आज कमाल तापमान 30 ते 32 अंश, तर किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस राहणार आहे.
advertisement
एकंदरीत पाहता, 3 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम राहणार असून उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडणार आहेत. यलो अलर्ट नसला तरी हवामानात मोठी बदल जाणवतील. पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून थंडीचा प्रभाव कमी होत जाणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.








