पुणे ते ठाणे आणि जळगाव ते अहिल्यानगर महापौर पदी कोण? कोणत्या पक्षाचा? वाचा पूर्ण यादी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mayor Election: राज्यातील जवळपास आठ ते दहा महापालिकांच्या महापौर पदाची निवडणूक संपन्न झाली.
मुंबई : राज्यात विविध महापालिकांत महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकांची लगबग सुरू आहे. राज्यातील जवळपास आठ ते दहा महापालिकांच्या महापौर पदाची निवडणूक संपन्न झाली असून महापौरपदी कोण बसणार, याची नावे पक्षाने जाहीर केली आहे आहेत. भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकांत निकाल आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याखालोखाल शिंदेसेनेने आपला दबदबा राखला. कोणत्या पक्षाचा कुठे महापौर, वाचा संपूर्ण यादी...
पुणे महापौर-मंजुषा नागपुरे (भाजप)
महापालिकेच्या महापौरपदासाठी (PMC Mayor) भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा भाजपकडून करण्यात आली. मंजूषा नागपुरे या अनुभवी नगरसेवक आहेत.
पुणे महापालिकेसाठी वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, नागपुरे यांच्या नावांवर पक्षनेतृत्वात चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतिम मोहोर उमटवली गेली असून मंजुषा नागपुरे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली.
advertisement
ठाणे महापौर- शर्मिला पिंपळोलकर (शिवसेना)
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवल्यानंतर महापौर पदासाठी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून महापौर पदाचा चार्ज स्वीकारला आहे.. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दौऱ्यावर असल्याकारणाने महापौर शर्मिला पिंपळोलकर या महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या नाहीत शिंदे ठाण्यात आल्या नंतर शर्मिला या कार्यालयात खुर्चीवर विराजमान होणार आहेत...
advertisement
कल्याण डोंबिवली-हर्षाली चौधरी थविल
कल्याण डोंबिवली महापालिकेला अखेर महापौर मिळाला असून, शिवसेना शिंदे गटाच्या हर्षाली थविल यांची बिनविरोध निवड झाली आहे. राहुल दामले यांची उपमहापौरपदी निश्चित निवड झाली आहे.
जळगाव-दीपमाला काळे (भाजप)
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महायुतीकडून भाजपच्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांनी दोन्ही नावांची थेट घोषणा केली.
advertisement
अहिल्यानगर- ज्योती गाडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
अहिल्यानगर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती गाडे यांची तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची नावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केली.
मिरा भाईंदर- डिंपल मेहता-(भाजप)
मिरा भाईंदरच्या महापौरपदावरून मराठी एकीकरण समितीने इशारा देऊनही भारतीय जनता पक्षाने डिंपल मेहता यांची निवड केली. मिरा भाईंदरमध्ये मराठी महापौरच झाला पाहिजे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती. परंतु भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांना महापौरपदी बसविण्यात आले आहे.
advertisement
वसई विरार- अजीव पाटील (बहुजन विकास आघाडी)
वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील यांना महापौरपदी बसण्याची संधी मिळाली आहे. बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले परंतु भारतीय जनता पक्षानेही महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. परंतु महापौरपदाच्या निवडणुकीत अजीव पाटील यांनी अपेक्षेनुसार बाजी मारली.
उल्हासनगर- अश्विनी निकम (शिंदेसेना)
उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अश्विनी निकम यांना महापौरपदी बसण्याची संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेची गणिते जुळवून आणून महापौरपदावर शिवसेनेची वाघीण बसवली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 5:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणे ते ठाणे आणि जळगाव ते अहिल्यानगर महापौर पदी कोण? कोणत्या पक्षाचा? वाचा पूर्ण यादी







