IND vs PAK : ICC च्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान टरकलं, पाठिंब्यासाठी फोनाफोनी, PCB बोर्डासह खेळाडू तोंडावर आपटणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसीने गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा इशारा पाकिस्तानला दिला होता. या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची टकरली असून आता तिने पाठिंब्यासाठी फोनाफोनी सूरू केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला कुणाचा पाठिंबा मिळाला आहे? हे जाणून घेऊयात.
T20 World Cup 2026, India vs Pakistan : टी20 वर्ल्ड कप 2026 सूरू होण्यापूर्वी पाकिस्तानच्या एका निर्णयाने मोठा वाद पेटला आहे.पण हा वाद आता पाकिस्तानच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.कारण पाकिस्तानने वर्ल्डकपमध्ये खेळण्याची तयारी दाखवली आहे, पण भारतासोबत 15 फेब्रुवारी 2026 श्रीलंकेच्या कोलंबोतील आर. प्रेमादास स्टेडिअमवर पार पडणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. या भूमिकेनंतर आयसीसीने गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा इशारा पाकिस्तानला दिला होता. या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची टकरली असून आता तिने पाठिंब्यासाठी फोनाफोनी सूरू केली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला कुणाचा पाठिंबा मिळाला आहे? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप खेळण्याची तयारी दाखवली आहे, पण भारताविरूद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानने निव्वळ ही घोषणा सोशल मीडियावर केली होती.या संदर्भातील आपली अधिकृत भूमिका पत्राद्वारे आयसीसीला कळवणे आवश्यक होते.पण पाकिस्तानला अशाप्रकारे आपली भूमिका मांडण्याची गरज वाटत नसल्याची माहिती आहे. दरम्यान पाकिस्तानच्या या भूमिकेनंतर आयसीसी प्रचंड आक्रमक झाली होती आणि तिने गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा पाकिस्तानला दिला होता.
advertisement
आयसीसीच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची हालत खूपच वाईट झाली आहे. कारण पाकिस्तानने लगेचच आपल्या मित्र देशांना फोनाफोनी करायला सूरू केली होती. या फोनाफोनीमधून पाकिस्तानने भारताविरूद्ध घेतलेल्या बहिष्काराच्या भूमिकेवर इतर देशांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण जवळपास सगळ्याच देशांकडून त्यांना नकार कळवण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान आपली भूमिका घेऊन एकटी पडली आहे, असे सुत्रांकडून बोलले जात आहे.
advertisement
पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या देशांच्या क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधला यावेळी त्यांना अपेक्षित अशी उत्तर मिळाली नाही.याउलट सर्व देशांना असं वाटलं की पाकिस्तानने जाणून बुझून वाद हा काढला. बांगलादेशला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी भारताविरूद्धचे सामने बॉयकॉट केले,अशी सुत्रांची माहिती आहे.त्यामुळे आता जर आयसीसीने सगळ्या देशाच्या क्रिकेट बोर्डाची बैठक बोलावली तर पाकिस्तान या बैठकीत एकटे पडणार आहे आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 5:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : ICC च्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान टरकलं, पाठिंब्यासाठी फोनाफोनी, PCB बोर्डासह खेळाडू तोंडावर आपटणार










