बेधुंद आज आसमंत सारा..! गिरिजा ओकचं गोड गाणं, नॅशनल क्रशवर फिदा झाला नवरा, कमेंट चर्चेत, VIDEO

Last Updated:

Girija Oak Song Ruperi Valut : नॅशनल क्रश फक्त अभिनयच नाही गोड गळ्याची गायिका देखील आहे. गिरीजा उत्तम गाते. गिरीजानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिच्या नवऱ्यानं शेअर केलेली कमेंट चर्चेत आली आहे.

News18
News18
नॅशनल क्रश अभिनेत्री गिरीजा ओक सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एका निळ्या साडीनं गिरीजा ओक रातोरात प्रसिद्ध झाली. एका मुलाखतीत गिरीजानं नेसलेली निळी साडी देशभरात व्हायरल झाली. गिरीजाचं सालस, सुंदर आणि नैसर्गिक सौंदर्याच्या संपूर्ण देश प्रेमात पडला. गिरीजा ही गेली अनेक वर्ष मराठी, हिंदी तसंच गुजराती रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करतेय. गिरीजानं ओटीटीवरही आपली छाप पाडली. गिरीजाचे निळ्या साडीतील फोटो व्हायरल झाल्यापासून ती चर्चेत आहे. यानिमित्तानं गिरीजाची अनेक काम प्रेक्षकांना माहिती पडली आहे.
गिरीजा उत्तम अभिनेत्री आहेत पण त्याचबरोबर ती उत्तम गायिका देखील आहे. नॅशनल क्रश फक्त अभिनयच नाही गोड गळ्याची गायिका देखील आहे. गिरीजा उत्तम गाते. गिरीजानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' हे गाणं तिनं गायलं आहे. द फॅमिली मॅनच्या जेकेबरोबर तिनं हे गाणं गायलं आहे. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीजा ओकचं गाणं ऐकून तिचा नवरा सुह्रद गोडबोले तिच्यावर फिदा झालाय. व्हिडीओखाली सुह्रदनं केलेली कमेंट चर्चेत आली आहे.
advertisement
"तळपदे मीट्स मिसेस झेंडे ऑन TunesDay. थँक्यू गिरीजा ओक. आमची नॅशनल क्रश", असं म्हणत जेके म्हणजेच अभिनेता शरीब हाशमी यानं गिरीजासोबत गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यानिमित्तानं शरीब देखील उत्तम मराठी बोलतो आणि गातो हे देखील पाहायला मिळालं. गिरीजानं अनेक दिवसांनी गाताना पाहून तिच्या चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Sharib Hashmi (@mrfilmistaani)



advertisement
शरीब आणि गिरीजा ओकच्या गाण्यावर गिरीजाचा नवरा फिदा झाला आहे. त्यानं व्हिडीओ केलेली कमेंट चर्चेत आली हे. मालाड सुप्रिमसी अशी कमेंट सुह्रद गोडबोले यानं केली आहे. सुह्रदची ही कमेंट चांगलीच व्हायरल झाली आहे. सुह्रदलाही गिरीजाचं गाणं आवडलं असून त्यानेही कौतुक केलं आहे.
advertisement
गिरीजा ओक उत्तम गाते. सोनी मराठीवरील सिगिंग स्टार या मराठी रिअलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती. तिथे गिरिजाने वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायली होती. सिगिंग स्टारचा हा सीझन फक्त कलाकारांसाठी होता. त्यात मराठीतील अनेक कलाकारांची सहभाग घेतला होता. गिरीजानं लावणीपासून भक्तगीतं तसंच शास्त्रीय गाणी देखील गायली होती. गिरीजाचं रुपेरी वाळूत हे गाणं ऐकल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा तिच्या सिगिंग स्टारमधील गाण्यांची आठवण झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बेधुंद आज आसमंत सारा..! गिरिजा ओकचं गोड गाणं, नॅशनल क्रशवर फिदा झाला नवरा, कमेंट चर्चेत, VIDEO
Next Article
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement