पुणे अहिल्यानगर हायवेवर विचित्र अपघात, आधी कियाला धडक नंतर समोर येईल त्या बाईकला चिरडत गेला टेम्पो

Last Updated:
पुणे–अहिल्यानगर हायवेवर कासारी फाटा येथे टेम्पो आणि पिकअपच्या भीषण अपघातात काही प्रवासी जखमी झाले, जीवितहानी नाही, वाहतूक कोंडी निर्माण झाली. तपास सुरू.
1/5
शिरूर/पुणे प्रतिनिधी सचिन तोडकर: पुण्यात अपघात काही थांबण्याचे नाव घेत नाही, आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला.  पुणे–अहिल्यानगर हायवेवर शिरूर तालुक्यातील कासारी फाटा इथे भीषण अपघात झाला.

advertisement
2/5
अहिल्यानगरवरून पुण्याकडे जात असलेल्या फुलांनी भरलेल्या पिकअप वाहनाला पाठीमागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेनंतर फुलांनी भरलेला पिकअप पलटी झाला.

3/5
तर टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या टपरी शेडमध्ये घुसला. याचदरम्यान पुण्यावरून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या ‘किया’ कारलाही या टेम्पोने ठोकर दिली. तसेच दोन ते तीन दुचाकी वाहनेही टेम्पोच्या खाली दबल्याची माहिती समोर आली आहे.

4/5
या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक झालेल्या या विचित्र अपघातामुळे पुणे–नगर हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

5/5
या अपघाताचे नेमकं कारण समजू शकलं नाही, अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली व घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने हटवली.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement