advertisement

Weather Alert: 48 तास धोक्याचे, पुणे ते नाशिक 13 जिल्ह्यांत थंडीची लाट, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात अचानक थंडीचा जोर वाढला असून काही जिल्ह्यांना ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस काळजी घ्यावी लागेल.
1/5
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठे बदल दिसू लागले आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करताच काही भागांत थंडी वाढली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकणसह काही भागात सकाळ-सायंकाळ गारवा कायम राहणार आहे, तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची तीव्र लाट जाणवेल. मंगळवारच्या तुलनेत अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला असून पुढील 2 दिवस 13 जिल्ह्यांत थंडीची लाट असेल.

2/5
मुंबईत आज सकाळचा गारवा मंगळवारपेक्षा किंचित कमी जाणवला. 9 डिसेंबर रोजी किमान तापमान 18°C होते, तर आज ते 19°C च्या आसपास राहिले. दिवसा तापमान 31–32°C पर्यंत जाणार असून दुपारी उष्णता वाढेल.पालघरमध्ये मात्र थंडी थोडी वाढली असून किमान तापमान 16–17°C वर पोहोचले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही सकाळचा गारवा कायम असून किमान तापमान 18°C च्या आसपास नोंदले गेले. दुपारी तापमान 31–32°C पर्यंत जाणार आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर हवामान स्थिर राहील.
मुंबईत आज सकाळचा गारवा मंगळवारपेक्षा किंचित कमी जाणवला. 9 डिसेंबर रोजी किमान तापमान 18°C होते, तर आज ते 19°C च्या आसपास राहिले. दिवसा तापमान 31–32°C पर्यंत जाणार असून दुपारी उष्णता वाढेल.पालघरमध्ये मात्र थंडी थोडी वाढली असून किमान तापमान 16–17°C वर पोहोचले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही सकाळचा गारवा कायम असून किमान तापमान 18°C च्या आसपास नोंदले गेले. दुपारी तापमान 31–32°C पर्यंत जाणार आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर हवामान स्थिर राहील.पालघरमध्ये मात्र थंडी थोडी वाढली असून किमान तापमान 16–17°C वर पोहोचले आहे.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही सकाळचा गारवा कायम असून किमान तापमान 18°C च्या आसपास नोंदले गेले. दुपारी तापमान 31–32°C पर्यंत जाणार आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टीवर हवामान स्थिर राहील.
advertisement
3/5
ठाणे, नवी मुंबई, कल्याण–डोंबिवली आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून हलकी थंडी जाणवत आहे. हवामान विभागानुसार आकाश दिवसभर स्वच्छ राहील आणि त्यामुळे सकाळ–संध्याकाळचा गारवा वाढलेला जाणवेल. किमान तापमान साधारण 17–19°C च्या दरम्यान नोंदवले जाईल, तर दिवसा 28–30°C पर्यंत वाढेल. नवी मुंबई व ठाण्यात आर्द्रतेमुळे गारठा थोडा जास्त जाणवेल, तर कल्याण–डोंबिवली पट्ट्यात हवेमध्ये कोरडेपणा अधिक असेल. एकंदरीत दिवसभर कोरडे, प्रसन्न आणि थोडंसं थंड हवामान कायम राहणार आहे.

4/5
पुणे जिल्ह्यात आज सकाळी तीव्र थंडी जाणवली आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून तापमानात कोल्ड वेव्हसदृश स्थिती आहे. मंगळवारी किमान तापमान 14°C पर्यंत होते, तर आज ते थेट 10–11°C वर घसरले. पुणे शहर, शिवाजीनगर, विमाननगर, मागील दोन वर्षांच्या तुलनेत याच दिवशी सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. घाटमाथ्यावर (ताम्हिणी, भोर घाट, खंडाळा जवळील भाग) थंडी आणखी कडक असून तापमान 8–9°C पर्यंत खाली आले आहे. दिवसा तापमान 27–28°C राहील. पुढील 3 दिवस पुण्यात सकाळची थंडी कायम राहणार असून तापमान 10–13°C दरम्यान उतरू शकते, असा अंदाज विभागाने दिला आहे
पुणे जिल्ह्यात आज सकाळी तीव्र थंडी जाणवली आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून तापमानात कोल्ड वेव्हसदृश स्थिती आहे. मंगळवारी किमान तापमान 14°C पर्यंत होते, तर आज ते थेट 10–11°C वर घसरले. पुणे शहर, शिवाजीनगर, विमाननगर, मागील दोन वर्षांच्या तुलनेत याच दिवशी सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. घाटमाथ्यावर (ताम्हिणी, भोर घाट, खंडाळा जवळील भाग) थंडी आणखी कडक असून तापमान 8–9°C पर्यंत खाली आले आहे. दिवसा तापमान 27–28°C राहील. पुढील 3 दिवस पुण्यात सकाळची थंडी कायम राहणार असून तापमान 10–13°C दरम्यान उतरू शकते, असा अंदाज विभागाने दिला आहे.
advertisement
5/5
उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील थंडीची लाट निर्माण झाली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस थंडीची लाट राहील. तर सोलापूरसह मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांना देखील ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 48 तास धोक्याचे असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement