Aaditya Thackeray: काका आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआन पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांचा नुकताच दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाला. दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मुंबईतील वेलिंग्टन क्लब इथं स्वागत समारंभ पार पडला. या समारंभासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते.
मराठी भाषेच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आलेत. बैठका असो की फॅमिली फंक्शन असेल प्रत्येक ठिकाणी ठाकरे बंधू सह कुटुंब एकत्र पाहण्यास मिळत आहे. अशातच दिल्लीनंतर आता मुंबईत अमित ठाकरे यांचे मेव्हणे डॉ. राहुल बोरुडे यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ मुंबईत पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंब एकत्र होतं. यावेळी मात्र काका आदित्य ठाकरे आणि पुतण्या किआनची दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद झाली.
advertisement
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ. राहुल बोरुडे यांचा नुकताच दिल्लीत विवाह सोहळा संपन्न झाला. डॉ. राहुल बोरुडे यांचा विवाह देशाचे लोकपाल अजय खानविलकर यांची कन्या शिवानी खानविलकर यांच्याशी झाला. या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितीत लावून नव दाम्पत्याला आशिर्वाद दिले होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










