Bhaji Recipe Video : आजी-आजोबा खातात त्या विड्याच्या पानांची भजी; लहान मुलांसाठीही आहे हेल्दी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Vidyachya Paanachi Bhaji Recipe Video : तुम्ही कधी विड्याच्या पानांची भजी खाल्ली आहे का? हो तेच विड्याचं पान जे तुमची आजी-आजोबा खातात. आता याची भजी कशी बनवायची ते पाहुयात.
आजवर तुम्ही भजीचे बरेच प्रकार खाल्ले असतील. कांदा भजी, बटाटा भजी, डाळींची भजी, पालक भजी, कोबीची भजी, कोथिंबीर भजी आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आहेत. पण तुम्ही कधी विड्याच्या पानांची भजी खाल्ली आहे का? हो तेच विड्याचं पान जे तुमची आजी-आजोबा खातात. आता याची भजी कशी बनवायची ते पाहुयात.
विड्याच्या पानांची किंवा खायच्या पानांची भजी वाचूनच काही जणांनी आश्चर्य वाटलं असेल. पान म्हणजे चांगलं नाही असं अनेकांना वाटतं. पण विड्याचं पान जे थोडं तिखट, थोडं तुरट आणि थोडं कडवट असतं, त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत, असं सांगितलं जातं. यामुळे कफ आणि थकवा कमी होतो, पचनक्रिया सुधारते, विटॅमिन्स सी मिळतं, स्मरणशक्ती वाढते, डोकेदुखीसाठी नैसर्गिक उपचार आहे.
advertisement
आरोग्यासाठी इतके फायदे असलेलं हे पान आपण आजी-आजोबांसारखं चघळून तर नाही खाऊ शकत. पण मग त्याची भजी बनवून तर नक्कीच खाऊ शकतो.
खाऊच्या पानांची भजी बनवण्यासाठी साहित्य
खाऊची किंवा विड्याची पानं
बेसन
तांदळाचं पीठ
हळद
advertisement
हिंग
ओवा
कोथिंबीर
सोडा
मीठ
तेल
पाणी
विड्याच्या पानांची भजी कशी बनवायची?
विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून त्याची देठं काढून घ्या. सगळी पानं एकावर एक ठेवून त्यांचा रोल करून ती आडवी चिरून घ्या. आता एका भांड्यात ही पानं घेऊन त्यात बेसन, तांदळाचं पीठ, हळद, मीठ, खायचा सोडा, ओवा हातांनी कुस्करून आणि कोथिंबीर बारीक चिरून टाका. सगळं नीट मिक्स करा. पाणी आणि थोडंसं तेल टाकून हाताने भजी टाकता येतील इतकं सैलसर पीठ भिजवा.
advertisement
कढईत तेल गरम करून ते नीट तापलं की त्यात एकएक करून भजी सोडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. विड्याच्या पानांची गरमागरम भजी खायला तयार. आजी-आजोबांना ही भजी द्या, सोबत तुम्ही खा आणि लहान मुलांनाही देऊ शकता.
advertisement
Tasty Chav फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही कधी विड्याच्या पानांची भजी खाल्ली होती का? नाही तर एकदा ही रेसिपी ट्राय करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे विड्याच्या पानांची किंवा आणखी काही अशी पारंपारिक, गावाकडची, पणजी-आजी-आईची हटके रेसिपी असेल तर तीसुद्धा आमच्यासोबत शेअर करा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 12, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Bhaji Recipe Video : आजी-आजोबा खातात त्या विड्याच्या पानांची भजी; लहान मुलांसाठीही आहे हेल्दी









