Puri Recipe Video : कडाकणी... नाव कडक पण कुरकुरीत आणि चवीला गोड पदार्थ, बनवायलाही सोपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kadakni Recipe Video : कडाकणी हे नाव जितकं हार्ड वाटतं, तितकीच बनवायलाही सोपी अशी ही रेसिपी. नावात कडक असलं तर कुरकुरीत आणि चवीला गोड असा हा पदार्थ आहे. या कडाकणी रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कडाकणी... नाव वाचूनच बाबो पदार्थाचं नावच इतकं कडक आहे, तर रेसिपी किती कठीण असेल, असं तुम्हाला वाटेल. पण कडाकणी हे नाव जितकं हार्ड वाटतं, तितकीच बनवायलाही सोपी अशी ही रेसिपी. नावात कडक असलं तर कुरकुरीत आणि चवीला गोड असा हा पदार्थ आहे. या कडाकणी रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
कडाकणी हा एक पारंपारिक पदार्थ आहे. जो नवरात्रीतविशेषत विजया दशमीनिमित्त देवीच्या नेवैद्यात किंवा प्रसाद म्हणूनही बनवला जातो. गव्हाच्या पीठ, गूळ आणि इतर साहित्य वापरून केलेली ही अतिशय खुसखुशीत, कुरकुरीत, कमी तेलकट अशा गोड पुऱ्या आहेत. आता फार वेळ न घेता आपण थेट यासाठी लागणारं साहित्य आणि ते कसं बनवायचं त्याची कृती पाहुयात.
advertisement
साहित्य
बारीक रवा - अर्धी वाटी
दूध - अर्धी वाटी
चिरलेला गूळ - पाऊण वाटी
गरम पाणी - अर्धी वाटी
गव्हाचं पीठ - 2 वाटी किंवा एक वाटी गव्हाचे पीठ+एक वाटी मैदा)
बेसन पीठ - 4 चमचे
advertisement
बडीशेप पूड - 2 चमचे
मीठ - एक टिस्पून
हळद - एक टिस्पून
कृती
रवा दुधात घालून 5 मिनिटं भिजत ठेवा..गुळामध्ये गरम पाणी ओता आणि गुळ पुर्णपणे विरघळवून गाळून घ्या . आता भिजवलेल्या रव्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन चाळून घाला. नंतर बडीशेप पूड, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. मिश्रण चमच्याने नीट मिक्स करा. आता थोडं थोडं गुळाचे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. 15 मिनिटं झाकून ठेवा.
advertisement
गॅसवर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवा. तोपर्यंत घट्ट मळून ठेवलेल्या पिठाच्या गोळ्याला साजूक तूप लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. पिठाचे छोटे छोटे गोळे बनवा. पीठ लावून पुरीसारखं लाटून घ्या. त्यावर छोट्या गोल डब्याचं झाकण ठेवून चिरण्याने कडा कापून घ्या आणि तापलेल्या तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या. कडाकणी तयार.
advertisement
Shrimant Yogi युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही कधी कडाकणी खाल्ली आहे का? बनवली आहे का? नाहीतर एकदा बनवून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्हाला जिथून हा व्हिडीओ मिळाला तिथं याला कडाकणी म्हटलं आहे, तुमच्याकडे आणखी काही वेगळं म्हणत असतील तर तेसुद्धा सांगात. तसंच तुमच्याकडेही अशा काही वेगळ्या लोकल, पारंपारिक रेसिपी असतील तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
December 11, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Puri Recipe Video : कडाकणी... नाव कडक पण कुरकुरीत आणि चवीला गोड पदार्थ, बनवायलाही सोपी










