Popati Recipe Video : पोपटी पार्टीसाठी कशाला हवा गाव, अलिबागचा बेत; शेतातील पोपटी बनवा घरीच तीही कुकरमध्ये

Last Updated:

How To Make Popati In Cooker : पोपटी पार्टी म्हटलं की मोकळी जागा, शेत, मातीचं मडकं हवं. पण यातील काहीच शक्य नसेल, पण पोपटी पार्टी करायची आहे तर... डोंट वरी याची व्यवस्था आम्ही केली आहे. घरीच कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची यासाठी खास रेसिपी. 

News18
News18
थंडी म्हटलं की पोपटी पार्टी आलीच. आता तर ख्रिसमस, थर्डी फर्स्ट जवळ येतो आहे, यानिमित्तानेही कितीतरी लोक पोपटी पार्टी करतात. आता पोपटी पार्टी म्हटलं ती मग मोकळी जागा, शेत असं ठिकाण हवं. मग यासाठी गावी जायचं किंवा अलिबाग, रायगड साइडला एखादं फार्म हाऊस बघायचं. पण यातील काहीच शक्य नसेल, पण पोपटी पार्टी करायची आहे तर... डोंट वरी याची व्यवस्था आम्ही केली आहे. पोपटी पार्टी आता तुम्ही तुमच्या घरातच करू शकता. यासाठी आम्ही खास घरी बनवता येईल अशी पोपटी रेसिपी आणली आहे.
गावाकडील शेतात बनवली जाणारी पोपटी तुम्ही घरात बनवू शकता तेसुद्धा कुकरमध्ये. कुकरमध्ये पोपटी, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कारण सामान्यपणे मातीच्या मडक्यात पोपटी बनवली जाते. पण आता ते शक्य नसेल तर तुम्ही घरात कुकरमध्येही पोपटी बनवू शकता. आता कशी ते पाहुयात.
साहित्य (तुमच्या गरजेनुसार आणि चवीनुसार)
पावटा किंवा वालाच्या शेंगा (तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा वापरू शकता जसं की तूर, मटार, राजमा)
advertisement
चिकन
अंडी
लाल तिखट (शक्यतो कांदा लसूण मसाला वापरा)
हळद
तेल
ओवा
बारीक मीठ
खडं मीठ
भांबुर्डीचा पाला/ केळीची पानं आणि पुदिना/ मक्याच्या साली
तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार बटाटा, रताळंही टाकू शकता.
कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची?
सगळ्यात आधी चिकन नीट स्वच्छ धुवून घ्या. त्याला आलं लसूण पेस्ट, लाल मसाला, हळद, मीठ, लिंबू रस, तेल लावून अर्धा तास मॅरिनेट करून घ्या. इतर शेंगा आणि बटाटा घेणार असाल तर दोन्ही एकत्र करून त्याला लाल तिखट आणि मीठ, तेल लावून घ्या.
advertisement
पोपटी म्हणजे भांबुर्डी पाला लागतो. पण तो सगळीकडे मिळेलच असं नाही. भांबुर्डी पाला नाही मिळाला तर तुम्ही तुम्ही केळ्याचं पान, मक्याच्या साली आणि पुदिना वापरू शकता. ही पानं कुकरच्या तळाला टाकायची आहे.
advertisement
आता पानांवर आधी शेंगा टाका. त्यावर मका, अंडी, चिकनचा थर लावा. वरून थोडं खडं मीठ टाका. त्यावर पाला ठेवा. पुन्हा एकदा शेंगा वर मका, अंडी, चिकनचा लेअर लावा, मीठ टाका आणि पुन्हा वर पानं लावा. वरून हवं असेल तर ओवा टाका.
advertisement
कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 6-7 शिट्ट्या करून घ्या. आता तुम्ही म्हणाल यात पाणी टाकलेलं नाही. तर चिकन शिजताना त्याला पाणी सुटतं. शिवाय मीठही टाकलं आहे. त्यामुळे त्याच्याच वाफेवर हे शिजेल. शिट्ट्या झाल्या की पोपटी गरमागरम काढा आणि लगेच खा.
advertisement
कुकरमधील पोपटी कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Popati Recipe Video : पोपटी पार्टीसाठी कशाला हवा गाव, अलिबागचा बेत; शेतातील पोपटी बनवा घरीच तीही कुकरमध्ये
Next Article
advertisement
Dharashiv News : कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग कारण
कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग
  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

View All
advertisement