Jowar Recipe Video : बुंदीचा लाडू नाही, ही आहेत मुटगी; एक वेगळाच चमचमीत पण हेल्दी पदार्थ

Last Updated:

Mutgi Recipe Video : हा बुंदीचा लाडू नाही, तर वेगळाच पदार्थ आहे. याला मुटगी असं म्हणतात. आता ही मुटगी म्हणजे काय? ती कशी बनवायची? त्यासाठी काय काय लागतं? ते पाहुयात.

News18
News18
हा फोटो पाहिल्यानंतर हे काय असं विचारलं तर बहुतेक जण बुंदीचा लाडू म्हणतील. तुम्हालाही तसंच वाटलं असेल. पण हा बुंदीचा लाडू नाही, तर वेगळाच पदार्थ आहे. याला मुटगी असं म्हणतात. आता ही मुटगी म्हणजे काय? ती कशी बनवायची? त्यासाठी काय काय लागतं? ते पाहुयात.
मुटगीचं मुख्य जिन्नस आहे ते ज्वारीचं पीठ. ज्वारीमध्ये खूप फायबर्स असतात तसंच यात ग्लुटन नसतं, त्यामुळे पचनासाठी चांगलं, पोटासाठी हलकं, पचन नीट होतं ज्यामुळे पचन चांगलं होतं. शिवाय ज्वारीत आयर्न, कॅल्शिअम आणि अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. आता अशा या पोषक ज्वारीपासून मुटगी कसे बनवायचे पाहुयात.
advertisement
मुटगी बनवण्यासाठी साहित्य
ज्वारीचं पीठ
लसूण
कडीपत्ता
जिरं
मीठ
लाल तिखट
मुटगी बनवायचे कसे? कृती
लसूण, कडीपत्ता, जिरं, मीठ आणि तुम्हाला तिखट आवडेल त्यानुसार लाल तिखट सगळं एकत्र करून ठेचून घ्या, त्याची चटणी बनवा.
आता ज्वारीची भाकरी बनवायची आहे. जुनं पीठ असेल तर त्यात थोडं कोमट पाणी टाकून पीठ भिजवा नाहीतर नुकत्याच दळलेल्या पिठात साधं पाणी टाकूनही पीठ मळू शकता. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार शक्यतो ज्वारीची भाकरी बनवताना जी शेवटची भाकरी असते त्याचे असे मुटगी बनवून मुलांना खायला दिले जातात.
advertisement
भाकरी नीट शेकवून झाली की ती कुस्करून घ्या. आता आधी जी चटणी वाटली त्यात भाकरीचे तुकडे टाकून वर तूप टाकून एकत्र ठेचून घ्या किंवा चटणी, भाकरी एकत्र मिक्सरला वाटून घेऊन नंतर त्यावर तूप टाकून एकत्र करा. आता हे मिश्रण लाडू वळतो त्या पद्धतीने वळा. याचे लाडू बनवून घ्या आणि मुटगी खायला तयार.
advertisement
advertisement
@brown_chef_india इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार का कर्नाटकातील एक पदार्थ आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Jowar Recipe Video : बुंदीचा लाडू नाही, ही आहेत मुटगी; एक वेगळाच चमचमीत पण हेल्दी पदार्थ
Next Article
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement