Kadhi Recipe Video : मडक्यातील चिपीची कढी, कधी टेस्ट केलीये का? आजी पणजीची जुनी रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chipi Kadhi Recipe Video : आजवर तुम्ही दह्याची कढी, ताकाची कढी, टोमॅटोची कढी, सोलकढी किंवा कोकम कढी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कढी टेस्ट केला असासल पण चिपीची कढी कधी टेस्ट केलीये?
दह्याची कढी, ताकाची कढी, टोमॅटोची कढी, सोलकढी किंवा कोकम कढी... कढीचे असे कितीतरी प्रकार. तुम्ही कितीतरी कढी ट्राय केल्या असतील. पण तुम्ही चिपीची कढी कधी टेस्ट केली आहे का? तुम्ही म्हणाल चिपी विमानतळ ऐकलंय पण चिपी कढी काय आहे? नावच अजब वाटत असेल. नेमकी ही चिपीची कढी काय आहे? ती कशी बनवतात पाहुयात.
चिपीची कढी ही पारंपारिक वऱ्हाडी रेसिपी आहे. कढी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. त्यामुळे त्याची चवही वेगळी असते. चिपीची कढी म्हणजे अशीच वऱ्हाडी पद्धतीची कढी आहे. आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती कशी बनवयाची याची रेसिपी.
advertisement
चिपीच्या कढीसाठी साहित्य
वाटणासाठी : आलं, 5-6 लसूण-पाकळ्या, नागवेलचं पान, दगडफूड, 2 लवंग, जिरं, 1 मिरची
फोडणीसाठी : मोहरी, जिरं, लोणी, कढीपत्ता, चिपी
कढीसाठी : ताक, बेसन
चिपीची कढी कशी बनवायची? कृती
आलं, लसूण, नागवेलचं पान, दगडफूड, लवंग, जिरं, मिरची वाटूण घ्या. आता चीप म्हणजे चपटा दगड, काहीजण त्याला ठिकरीही म्हणतात. ही चीप चुलीत टाकून ठेवा, जेणेकरून ती तोपर्यंत गरम होईल.
advertisement
आता एका भांड्यात ताक घ्या. त्यातील थोडं ताक एका लहान भांड्यात घेऊन त्यात बेसन पीठ टाकून नीट मिक्स करून घ्या. पूर्ण ताकात बेसन पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या होतात. कढी घट्ट-पातळ जशी आवडेल त्यानुसार बेसन पीठचं प्रमाण कमी-जास्त करा. बेसन पीठ ताकात नीट मिसळलं की ते दुसऱ्या ताकात ओता. आता यात हळद, चवीनुसार मीठ आणि वाटलेलं वाटण टाकून मिक्स करून घ्या. आता भांडं विस्तवावर ठेवा आणि ढवळत राहा नाहीतर ताक फाटण्याची शक्यता आहे.
advertisement
कढीला उकळी आली की ते भांडं खाली उतरवा. आता मडकं घ्या आणि ते चुलीच्या निखाऱ्यारवर गरम करायला ठेवा. चुलीत टाकलेली चीप काढून ती या मडक्यात टाका.
फोडणीसाठी जिरं, मोहरी, लवंगपूड आणि कढीपत्त्याची पानं सगळं लोण्यासोबत मिक्स करून घ्या आणि मडक्यात टाकून मडक्यावर झाकण ठेवा. जिरं, मोहरी चांगली तडतडली की बनवलेल्या कढीपैकी थोडी कढी यात ओता आणि पुन्हा झाकण मारून घ्या. नंतर उरलेली कढी आणि कोथिंबीर टाका. ताकाची चिपीची फोडणीची कढी तयार.
advertisement
Swaras Art या युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही कढी बनवून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणत्या पद्धतीने कढी बनवता त्याचीही रेसिपी आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 07, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kadhi Recipe Video : मडक्यातील चिपीची कढी, कधी टेस्ट केलीये का? आजी पणजीची जुनी रेसिपी


