Besan Recipe Video : नॉनव्हेजच्या चवीची भाजी, यासमोर चिकन-मटणही फेल

Last Updated:

Besan Bhaaji Recipe : मार्गशीर्ष सुरू असल्याने अनेकांना नॉनव्हेज खायला मिळत नाही आहे. अशाच नॉनव्हेजप्रेमींसाठी नॉनव्हेजच्या चवीची ही खास रेसिपी.

News18
News18
सध्या मार्गशीर्ष चालू आहे. या कालावधीत बरेच लोक नॉनव्हेज खात नाही. नॉनव्हेजप्रेमींना तर कधी मार्गशीर्ष संपतो असं झालं असेल, अशाच नॉनव्हेजप्रेमींसाठी ही खास रेसिपी. नॉनव्हेजच्या चवीची बेसनची भाजी, जी चिकन-मटणपेक्षाही भारी लागते. या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. आता ही भाजी कशी बनवायची थेट आपण कृतीकडेच वळुयात.
कढईत अर्धी वाटी सुकं खोबरं रंग बदलेपर्यंत परतून घ्या. कांदा टाका आणि मध्यम आकाराचा कांदा मिनिटभर परतून घ्या. मध्यम आकाराचा टोमॅटो टाका आणि मीठ टाका जेणेकरून टोमॅटोला पाणी सुटतं आणि टोमॅटो लवकर शिजतो. हे थंड करून कोथिंबीर टाकून थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
advertisement
३ मोठे चमचे बेसन पीठ घ्या. चवीनुसार मीठ टाका, थोडा गरम मसाला, बेडकी मिरची मसाला पावडर, हळद, जिरे पूड आणि तेल टाका. सगळं नीट मिक्स करा. थोडंथोडं पाणी टाकून बेसन पीठ घट्ट मळून घ्या. १० मिनिटं झाकण ठेवून मुरवत ठेवा. पुन्हा मळा आणि छोटे छोटे तुकडे करून घ्या. सारखा नाही तर ओबडधोबड आकार ठेवा.
advertisement
कढईत तेल गरम करून त्यात बेसनचे गोळे तळून घ्या. याच तेलात खडे मसाले टाका. कडीपत्ता, आलं-लसूण-जिरं पेस्ट टाका. एक चमचा जिरे पावडर, दीड चमचा मटण मसाला, अर्धा चमचा तिखट लाल पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा धने पावडर, एक चमचा रंगासाठी बेडगी मिरची पावडर, पाव चमचा हिंग टाकून मसाले परतून घ्या. नंतर तयार केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परता.
advertisement
आता अर्धा ग्लास पाणी टाका. पुन्हा ते सुटेपर्यंत शिजवा.  आता रस्सा बनवायचा असल्याने अडीच ग्लास गरम पाणी टाका. त्यात बेसनेचे गोळे टाकून झाकण ठेवून मंद आचेवर रस्सा घट्ट होईपर्यंत आणि बेसनचे गोळे शिजेपर्यंत शिजवून घ्या. 15 मिनिटांत भाजी शिजेल. गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
advertisement
Megha Vlog युट्युब चॅनेलवर या रेसिपीचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही भाजी बनवून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Besan Recipe Video : नॉनव्हेजच्या चवीची भाजी, यासमोर चिकन-मटणही फेल
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement