संदीप खरेंच्या लाडक्या लेकीचा थाटात पार पडला साखरपुडा, कोण आहे रुमानीचा होणारा नवरा?

Last Updated:
Roomani Khare Engaged : संदीप खरे यांची लेक रुमानी खरेचा साखरपुडा पार पडला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
1/7
 मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार-कवी संदीप खरे यांची लेक रुमानी खरे हिचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. साखरपुड्याचे फोटो शेअर करत रुमानीने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

advertisement
2/7
 'तू तेव्हा तशी' या मालिकेच्या माध्यमातून रुमानी खरेने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. तिने साकारलेली राधी ही भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर रुमानी 'दुर्गा' या मालिकेतही दिसली होती.

3/7
 रुमानी खरेने आता आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. 13 डिसेंबर 2025 रोजी रुमानीचा थाटामाटात साखरपुडा पार पडला.

4/7
 रुमानीचा होणारा पती आणि संदीप खरे यांचा होणारा जावई हा लोकप्रिय अभिनेता स्तवन शिंदे आहे. स्तवनने अनेक मालिका आणि चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पडली आहे.

5/7
 स्तवनने 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. तसेच पार्टी, क्लास ऑफ 83 या चित्रपटांतही त्याने काम केलंय.

6/7
 रुमानी खरे आणि स्तवन शिंदे यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

7/7
 रुमानी खरे आणि स्वतन शिंदे यांच्या लग्नाची आणि आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. रुमानीचं सध्या यशोमन आपटेसोबत 'लागली पैज' हे नाटक सुरू आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement