Poli Recipe Video : पाहताच पुरणपोळी वाटेल पण ही आहे त्रिपुरसुंदरी; तोंडात ठेवताच विरघळणारा एक श्रीमंत पदार्थ

Last Updated:

Tripursundari Recipe Video : त्रिपुरसुंदरी... नाव वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. हा नेमका काय प्रकार आहे, पुरणपोळीसारख्या दिसणाऱ्या या पदार्थाला त्रिपुरसुंदरी असं का म्हणतात. ती कशी बनवायची, त्यासाठी काय काय लागतं? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील.

News18
News18
हे काय आहे? असं विचारलं. तर फोटो पाहून तुम्ही पुरणपोळीच म्हणाल. पण ही पुरणपोळी नाही. तर पुरणपोळीसारखी दिसणारी ही त्रिपुरसुंदरी आहे. त्रिपुरसुंदरी हा एक पारंपारिक गोड पदार्थ. जो विस्मरणात गेलेला एक गोड श्रीमंत पदार्थ आहे. ज्याचा रेसिपी व्हिडीओ सोशल मीडियावर आहे.
त्रिपुरसुंदरी... नाव वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. हा नेमका काय प्रकार आहे, पुरणपोळीसारख्या दिसणाऱ्या या पदार्थाला त्रिपुरसुंदरी असं का म्हणतात. ती कशी बनवायची, त्यासाठी काय काय लागतं? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्यामुळे आता थेट कृतीकडेच वळुयात.
एका भांड्यात दीड वाटी गव्हाचं पीठ घ्या. अर्ध गव्हाचं आणि अर्ध मैदाचं पीठही घेऊ शकता. यात रंगासाठी अर्धा चमचा हळद घ्या. पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या. थोड्याशा पाण्यात थोडं मीठ आणि तेल टाकून घ्या पिठात ओतून पीठ मऊसर मळून घ्या. पीठ चिकट व्हायला नको म्हणून त्यात आधी मीठ टाकलेलं नाही. पीठ मळल्यानंतर एक चमचा तेल घाला आणि तेल पिठात मुरेपर्यंत मळून घ्या. दीड वाटी पिठासाठी एक वाटी पाणी लागलं आहे. पीठ 15 मिनिटं, अर्धा तास किंवा तासभर झाकून ठेवा.
advertisement
चणाडाळ रात्रभर भिजवून धुवून घ्या. कुकरमध्ये अर्धी वाटी डाळ आणि त्यात एक-दीड पाणी म्हणजे डाळ भिजेपर्यंत पाणी घाला. यात रंगासाठी पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा तेल घालून कुकरचं झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढून घ्या.
advertisement
एक वाटी डाळीला अर्धी वाटी बदाम असं प्रमाण घेऊन बदाम रात्री भिजवत ठेवा. बदाम सोलून घ्या. मिक्सरमध्ये पाणी न घालता त्याची पेस्ट करून घ्या.
कुकरमध्ये शिजवलेली डाळीतील पाणी चाळणीतून गाळून घ्या. डाळीचं पाणी तुम्ही कटाच्या आमटीसाठी किंवा दुसऱ्या पदार्थात वापरू शकता. ज्या चाळणीत डाळ आहे, त्यात चाळणीत बदामाची पेस्ट आणि अर्धी वाटी खवा घालून हातांनी मिक्स करून घ्या. त्यानंतर चमच्याने ते चाळणीतून बारीक करून घ्या. पुरण तयार झालं आहे.
advertisement
गॅसवर एक पॅन ठेवून त्यात एक लहान चमचा तूप घ्या. यात डाळीचं तयार केलेलं पुरण टाकून एक-दोन मिनिटं परतवून घ्या. पाव वाटी साखर घाला. साखर विरघळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता यात एक चमचा वेलचीपूड आणि थोडी जायफळ पूड घाला. पुरण नीट मिक्स करून घ्या. या मिश्रणात चमचा उभा ठेवा. जर चमचा नीट उभा राहिला तर मिश्रण तयार, चमचा पडत असेल तर मिश्रण थोडं आणखी परतून घ्या आणि थंड करून घ्या.
advertisement
आता मळलेलं गव्हाचं पीठ पुन्हा मळून घ्या. जितकी मोठी पोळी हवी त्यानुसार गोळा तयार करून घ्या. त्यात तयार केलेलं थोडं पुरण भरा. गोळा बनवून मैद्याच्या पिठात घोळवून पुरणपोळीप्रमाणे हलक्या हाताने  पातळ पोळी लाटून घ्या. पोळपाटवर बटर पेपर ठेवल्याने पोळी लाटणं सोपं होतं.
advertisement
गॅसवर तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या. यावर खालची बाजू तव्यावर पडेल अशा पद्धतीने पोळी टाका. पोळी एका बाजूने भाजून घ्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूने शेकवा. पहिल्या बाजूला तूप लावून घ्या. दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या.
कर्नाटकात प्रामुख्याने धारवाडमध्ये बनवला जाणारा हा पदार्थ. जिथं ही पोळी तव्यावरून काढून थेट तुपाने भरलेल्या भांड्यात काढली जाते. तुम्हाला जास्त तूप आवडत नसेल तर तुम्ही चमच्याने संपूर्ण पोळीवर तूप लावून घ्या. ही पोळी तुपाने भरलेल्या भांड्यातच काढली जाते, शिवाय त्यात बदामासारखे महागडे जिन्नस आहेत त्यामुळे याला त्रिपुरसुंदरी असं म्हणतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Poli Recipe Video : पाहताच पुरणपोळी वाटेल पण ही आहे त्रिपुरसुंदरी; तोंडात ठेवताच विरघळणारा एक श्रीमंत पदार्थ
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement