Celebrity Recipe Video : मुलांच्या डब्यासाठी रेणुका शहाणे बनवायची शॉर्टकट पुरणपोळी; सांगितली रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Renuka Shahane Short Cut Puranpoli Recipe Video : आता शॉर्टकट पुरणपोळी म्हणजे नेमकी कशी बनवायची हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. रेणुका शहाणे यांनी त्याची रेसिपीही सांगितली आहे.
पुरणपोळी... म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. खायला जितकी भारी तितकीच बनवायलाही. पुरणपोळी बनवणं सोपं नाही. अनेकांना ती कठीण वाटते. पुरणपोळी बनवणं सोपं नाही. डाळ भिजवण्यापासून पुरणपोळी भाजण्यापर्यंत प्रत्येक स्टेपमध्ये स्किल आहे. अशात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी शॉर्टकट पुरणपोळीची रेसिपी दाखवली आहे.
सामान्यपणे पुरणपोळी कशी बनवतात. तर चण्याची डाळ भिजवतात. डाळ आणि गूळ शिजवतात. ते वाटून पुरण बनवतात. पीठ मळून त्याचे गोळे करून त्यात हे डाळ-गुळाचं पुरण भरून लाटून त्याची पुरणपोळी बनवतात आणि दोन्ही बाजूंनी तूप लावून खरपूस भाजून घेतात.
advertisement
तशी पाहायला गेली तर खूप मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे डब्यासाठी पुरणपोळीचा विचारच नको असं वाटतं आणि डब्यात पुरणपोळी द्यायची म्हणजे एकतर ती आधीपासूनच बनवून ठेवायला हवी. पण रेणुका शहाणे हीच पुरणपोळी त्यांच्या मुलांना डब्यात द्यायच्या अगदी शॉर्टकट पद्धतीने बनवून. आता शॉर्टकट पुरणपोळी म्हणजे नेमकी कशी बनवायची हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. रेणुका शहाणे यांनी त्याची रेसिपीही सांगितली आहे.
advertisement
रेणुका शहाणे यांनी सांगितलं की चण्याची डाळ भिजत घालायची. त्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं. आता कुकरमध्ये ही डाळ, गूळ, वेलची पूड आणि जायफळ पूड सगळं एकत्र टाकायचं. डाळ भिजेल इतकं पाणी कुकरमध्ये टाकायचं आणि झाकण लावून डाळ चांगली शिजेल इतक्या शिट्ट्या काढायच्या. त्यानंतर हे मिश्रण मॅश केलं की पुरणपोळीचं झटपट पुरण तयार आणि मग काय आपण पुरणपोळी करतो तशीच करायची.
advertisement
advertisement
रेणुका शहाणे यांनी फूड इन्स्टा अकाऊंटवर शॉर्टकट पुरणपोळीची ही रेसिपी सांगितली आहे. तुम्ही एकदा ट्राय करून पाहा आणि कशी झाली ते आम्हाला नक्की सांगा.
तुम्ही किंवा तुमची आई वगैरे अशी कोणती शॉर्टकट रेसिपी करते तेसुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 13, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Celebrity Recipe Video : मुलांच्या डब्यासाठी रेणुका शहाणे बनवायची शॉर्टकट पुरणपोळी; सांगितली रेसिपी










