advertisement

'आयुष्यभर याच एका व्यक्तीसोबत...', ललित प्रभाकरने एका झटक्यात तोडली लाखो चाहतींची मनं, लग्नाबद्दल केली मोठी घोषणा

Last Updated:
Lalit Prabhakar marriage: मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक, तरुणींचा फेव्हरेट आणि ज्याच्या एका स्माइलवर हजारो मुली फिदा होतात, तो ललित प्रभाकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय.
1/7
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक, तरुणींचा फेव्हरेट आणि ज्याच्या एका स्माइलवर हजारो मुली फिदा होतात, तो ललित प्रभाकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. पण यावेळी चर्चेचं कारण त्याचा एखादा नवा सिनेमा किंवा रोमँटिक सीरिज नसून, त्याने लग्नाबद्दल केलेलं एक खळबळजनक विधान आहे.

2/7
'जुळून येती रेशीमगाठी'मध्ये आदित्यची भूमिका साकारून घराघरात आदर्श नवरा म्हणून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या ललितने खऱ्या आयुष्यात मात्र लग्नाला रामराम ठोकला आहे.
'जुळून येती रेशीमगाठी'मध्ये आदित्यची भूमिका साकारून घराघरात आदर्श नवरा म्हणून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या ललितने खऱ्या आयुष्यात मात्र लग्नाला रामराम ठोकला आहे.
advertisement
3/7
वयाची ३८ वर्षे पूर्ण केलेल्या ललितला सध्या जिथे तिथे एकच प्रश्न विचारला जातो,
वयाची ३८ वर्षे पूर्ण केलेल्या ललितला सध्या जिथे तिथे एकच प्रश्न विचारला जातो, "ललित, लग्नाचा विचार काय आहे? वरात कधी निघणार?" पण या प्रश्नावर ललितने आता पूर्णविराम लावला आहे.
advertisement
4/7
'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या एका दिलखुलास मुलाखतीत त्याने स्पष्ट केलं की, तो कधीही लग्नबंधनात अडकणार नाही. ललितच्या या निर्णयामुळे त्याच्या महिला चाहत्यांमध्ये मात्र निराशेचं वातावरण आहे. ललितने केवळ लग्न करणार नाही असं म्हटलं नाही, तर त्याने सध्याच्या लग्नसंस्थेवर थेट निशाणा साधला आहे.

5/7
तो म्हणाला,
तो म्हणाला, "मला मुळात ही लग्नसंस्थाच एक समस्या वाटते. कोणीतरी मला येऊन सांगावं की तुला आता आयुष्यभर याच एका व्यक्तीसोबत राहायचं आहे, हे बंधन मला कदापि मान्य नाही. आपण जुन्या काळापासून चालत आलेल्या प्रथा डोळे मिटून पुढे नेतोय. पूर्वीच्या अनेक चुकीच्या प्रथा बंद झाल्या, तसाच विचार या बाबतीतही व्हायला हवा."
advertisement
6/7
ललितने पुढे सांगितलं की, त्याला स्वतःची कंपनी जास्त आवडते.
ललितने पुढे सांगितलं की, त्याला स्वतःची कंपनी जास्त आवडते. "मी कॉलेजमध्ये असताना काही नात्यांमध्ये होतो, पण आता अनेक वर्षांपासून मी एकटा आहे आणि मी या एकटेपणात खूप सुखी आहे," असंही त्याने मान्य केलं.
advertisement
7/7
ललितने मिश्किलपणे लग्नाच्या विधींबद्दलही भाष्य केलं. तो म्हणाला,
ललितने मिश्किलपणे लग्नाच्या विधींबद्दलही भाष्य केलं. तो म्हणाला, "मी आजवर माझ्या अनेक सिनेमांमध्ये इतक्या थाटामाटात लग्नाचे सीन दिलेत, इतके विधी केलेत की, आता खऱ्या आयुष्यात पुन्हा तेच सगळं करण्याची माझी अजिबात इच्छा नाही."
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement