पुण्यातील वृद्धाला 22 कोटींचा गंडा! वेगवेगळी शहरं अन् 19 बँक अकाऊंट, टोळीने कसा केला एवढा मोठा 'गेम'? अखेर मोठा उलगडा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या टोळीने पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २२ कोटी ३ लाख २२ हजार ७४२ रुपयांना ऑनलाइन गंडा घातला आहे.
पुणे: शेअर्स ट्रेडिंगमधून अफाट नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने पुण्यातील एका ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल २२ कोटी ३ लाख २२ हजार ७४२ रुपयांना ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरमधून चार आरोपींना अटक केली आहे.
१९ बँक खात्यांचा वापर अन् गुंतागुंतीचा तपास
फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले गेले. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून एकूण १९ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास लावले. एकदा पैसे जमा झाले की, ती रक्कम तत्काळ इतर अनेक खात्यांमध्ये वर्ग केली जात होती. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक व्यवहारांच्या मागोवा घेत या गुन्ह्याचे धागेदोरे शोधून काढले.
advertisement
अंबरनाथ आणि संभाजीनगरमधून आरोपींना अटक
या कारवाईत पोलिसांनी मुनिलकुमार सुरेंद्रसिंह (५१, रा. अंबरनाथ), आकाश चंद्रशेखर मराठे (२७), लाला केशव उमाप (२६) आणि परमेश्वर दिलीप दाभाडे (२३, सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही बँक खाती या आरोपींच्या नावावर होती आणि त्यांचा वापर फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी केला जात होता.
advertisement
ज्येष्ठ नागरिक सायबर भामट्यांच्या टार्गेटवर
वाढत्या वयामुळे तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसलेले ज्येष्ठ नागरिक सध्या सायबर चोरट्यांचे प्रमुख लक्ष्य बनत आहेत. "अधिक परतावा" देणाऱ्या कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका किंवा अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे गुंतवू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 7:11 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यातील वृद्धाला 22 कोटींचा गंडा! वेगवेगळी शहरं अन् 19 बँक अकाऊंट, टोळीने कसा केला एवढा मोठा 'गेम'? अखेर मोठा उलगडा






