Chinese Horoscope: कोणा-कोणाची रास कुत्रा? जन्मसाल यापैकी असलेली माणसं या राशीत येतात, लय गुणाची
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chinese Horoscope: आपल्याप्रमाणेच चीनमध्ये 12 राशी मानल्या जातात, पण तेथील राशींची नावे वेगळी असून विशेष गोष्ट म्हणजे या राशींची नावं प्राण्यांवर आधारित आहेत. त्यांच्या राशीचक्रातील आज आपण कुत्रा राशीबद्दल जाणून घेणार आहोत, ती चीनी राशीचक्रातील अकरावी रास असते. या राशीचे लोक त्यांच्या प्रामाणिकपणा आणि खरेपणासाठी ओळखले जातात. ते चांगले मित्र सिद्ध होतात. ते लोक त्यांच्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडतात आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. कुत्रा रास कोणाची असते आणि या राशीचे लोक कसे असतात, ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
इतरांना मदत करणारे असतात. अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत आणि त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. त्यांच्यात दया आणि करुणा याची भावना खूप जास्त असते. कोणाचंही दुःख त्यांच्याकडून पाहिलं जातं नाही आणि ते लगेच त्या व्यक्तीला सांत्वन देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी पुढे सरसावतात.
advertisement
हे लोक विचारपूर्वक चालणारे असतात. कोणताही निर्णय घेण्याआधी ते प्रत्येक बाजूचा खोलवर विचार करतात आणि घाईगर्दीत निर्णय घेत नाहीत. मजबूत इराद्याचे असतात. एकदा काही करण्याचा निश्चय केल्यास, ते आपल्या ध्येयापासून सहसा विचलित होत नाहीत. अत्याधिक संवेदनशील असतात. इतरांच्या भावना आणि त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर खूप खोल परिणाम होतो.निडर स्वभावाचे असतात. अन्याय होत असेल किंवा कोणाला मदत करण्याची गरज असेल, तेव्हा ते घाबरत नाहीत आणि धाडसाने परिस्थितीचा सामना करतात.
advertisement
कुत्रा राशीच्या लोकांच्या कमजोर बाजू -ते खूप जास्त भावूक असतात. लोक त्यांच्या याच कमजोरीचा फायदा घेतात आणि त्यांना भावनिकरित्या सहजपणे दुखावू शकतात. प्रत्येक गोष्ट मनावर घेतात. एखादी लहानशी टीका किंवा नकारात्मक गोष्ट सुद्धा ते लगेच वैयक्तिकरित्या घेतात, ज्यामुळे ते लवकर दुःखी होतात. खूप सरळ आणि साधा स्वभाव असतो. अनेकदा समोरच्या व्यक्तीचा चालाकीपणा किंवा दुटप्पी स्वभाव समजू शकत नाहीत आणि लवकर विश्वास ठेवतात.







