Astrology: गेले 12 महिने त्रासात गेलेत! शनिच्या घरात सूर्याची एंट्री आता या राशींना उभारी-झळाळी देणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Surya Astrology: ग्रहांची रास बदलण्याची प्रक्रिया निरंतर चालत राहते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला एकदा राशी बदलतो आणि या बदलाला संक्रांत म्हणतात. सूर्य ज्या राशीत प्रवेश करतो, त्याच नावावरून त्या संक्रांतीची ओळख होते. नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये, सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सूर्याचा शनीच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. यासोबतच मांगलिक कार्य (शुभ कार्य) देखील सुरू होतील.
advertisement
advertisement
मीन रास - सूर्याचा मकर राशीत प्रवेश होऊन तो तुमच्या राशीतून अकराव्या भावात असल्यामुळे अत्यंत शुभ फळं मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी लाभ, यश आणि प्रगतीचा आहे. या कालावधीत करिअर खूप शानदार राहील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. पदोन्नती, नवी जबाबदारी आणि पगारात वाढ यांसारख्या आनंदाच्या बातम्या मिळण्याचे प्रबळ योग आहेत. कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल.
advertisement
मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत फलदायी असेल. व्यवसायात मोठे यश आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील, तुम्ही हुशारीनं चांगली बचतही करू शकाल. कुटुंबासोबतचे संबंध गोड राहतील. घरातील वातावरण सुखद राहील आणि कुटुंबियांसोबत आनंदात वेळ घालवता येईल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ऊर्जा अनुभवाल.
advertisement
मकर - या राशीच्या लोकांना सूर्य देवांचे हे गोचर खूप शुभ आणि लाभदायक ठरू शकते. सूर्य या राशीच्या गोचर कुंडलीतील लग्न भावात प्रवेश करेल. मकर राशीच्या लोकांचा कामात आत्मविश्वास, ऊर्जा आणि आकर्षणामध्ये उल्लेखनीय वाढ होईल. या कालावधीत तुम्हाला समाजात आणि कार्यस्थळी मान-सन्मान मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या योजना यशस्वी होतील आणि नव्या संधी मिळतील. आरोग्य संतुलित राहील. घरात सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. मकरेच्या अविवाहित असणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे. विवाहाचा प्रस्ताव किंवा चांगलं नातं जुळून येण्याची शक्यता आहे. एकूणच सूर्याचे हे गोचर तुम्हाला आत्मविश्वास, सन्मान, संधी आणि नात्यांमध्ये समृद्धी देईल.
advertisement
वृश्चिक -या राशीच्या गोचर कुंडलीतील तिसऱ्या भावात सूर्य भ्रमण करणार आहेत. अशा वेळी या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. बऱ्याच काळापासून थांबलेली कामं पूर्ण होतील आणि जीवनात आनंदाची चाहूल लागेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप सक्रिय राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावे लागू शकतो, तो तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. तुमची मेहनत आणि समर्पण पाहून पदोन्नतीचेही प्रबळ संकेत आहेत.
advertisement
वृश्चिक - आर्थिक स्थिती चांगली होईल आणि पैसे कमावण्याच्या अनेक नव्या संधी प्राप्त होऊ शकतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. त्यांच्या अभ्यासासंबंधीच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. यासोबतच परदेशात जाण्याची किंवा परदेशात संधी मिळण्याची शक्यताही दिसून येत आहे. आरोग्याच्या बाबतीत हा काळ चांगला राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









