Dhurandhar: रहमान डकैतच्या एन्काउंटरनंतर काय घडलं? फिल्ममध्ये दाखवलीच नाही 'ही' Untold Story

Last Updated:
Rehman Dakait Encounter Story: सध्या भारतात 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, पण रहमानचा मृत्यू दाखवल्यानंतर ल्यारीत प्रत्यक्षात काय झाले?
1/11
मुंबई: सध्या भारतात 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असला तरी, पाकिस्तानच्या राजकारणात आणि अंडरवर्ल्डमध्ये त्याने मोठी खळबळ माजवली आहे.

advertisement
2/11
कराचीच्या लियारी भागातील कुख्यात गँगस्टर सदार अब्दुल रहमान बलोच उर्फ 'रहमान डकैत' आणि एसएसपी चौधरी असलम यांच्यातील रक्तरंजित संघर्षाची ही कहाणी आहे. पण चित्रपटात रहमानचा मृत्यू दाखवल्यानंतर लियारीत प्रत्यक्षात काय झाले?

3/11
१९८० मध्ये जन्मलेल्या रहमान डकैतने फार कमी वयात गुन्हेगारी जगताची वाट धरली. खून, खंडणी, तस्करी अशा अनेक गंभीर आरोपांमुळे २१ वर्षांचा असतानाच लियारीमध्ये त्याची दहशत पसरली.

4/11
रहमानची खरी ताकद त्याची बंदूक नसून, राजकारणाशी असलेले त्याचे जवळचे संबंध होते. लियारी हा पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा बालेकिल्ला असल्याने, अनेक नेत्यांनी त्याला आश्रय दिला होता.

5/11
२००८ मध्ये त्याने स्वतःला 'गँगस्टर'च्या प्रतिमेतून बाहेर काढण्यासाठी पीपल्स अमन कमिटी स्थापन केली आणि समाजसेवक बनण्याची घोषणा केली. त्याने निवडणूक लढवण्याचीही तयारी केली होती. आणि नेमक्या याच वेळी त्याच्या कहाणीला भयानक कलाटणी मिळाली.
२००८ मध्ये त्याने स्वतःला 'गँगस्टर'च्या प्रतिमेतून बाहेर काढण्यासाठी पीपल्स अमन कमिटी स्थापन केली आणि समाजसेवक बनण्याची घोषणा केली. त्याने निवडणूक लढवण्याचीही तयारी केली होती आणि नेमक्या याच वेळी त्याच्या कहाणीला भयानक कलाटणी मिळाली.
advertisement
6/11
९ ऑगस्ट २००९ रोजी एसएसपी चौधरी असलम यांच्या नेतृत्वाखालील पोलिस एन्काऊंटरमध्ये ५० लाखांचे बक्षीस असलेला रहमान डकैत मारला गेला. चौधरी असलम यांनी स्वतः मीडियासमोर येऊन 'मरणाऱ्याचे नाव रहमान डकैत आहे,' असे जाहीर केले.

7/11
पण त्याच्या मृत्यूनंतर लियारीमध्ये शांतता परतली नाही, उलट विद्रोह भडकला! लियारीतील गाबोल पार्कमध्ये हजारो लोक जमा झाले. लोकांनी थेट सत्ताधारी पीपीपी नेत्यांवर दगाबाजीचा आरोप केला.
पण त्याच्या मृत्यूनंतर ल्यारीमध्ये शांतता परतली नाही, उलट विद्रोह भडकला! लियारीतील गाबोल पार्कमध्ये हजारो लोक जमा झाले. लोकांनी थेट सत्ताधारी पीपीपी नेत्यांवर दगाबाजीचा आरोप केला.
advertisement
8/11
ज्या नेत्यांनी त्याला अनेक वर्षे राजकीय संरक्षण दिले, त्याच नेत्यांनी तो डोईजड झाल्यावर त्याला संपवले, असा संताप स्थानिकांमध्ये होता.

9/11
रहमानची पत्नी उल्फत यांनी हा बनावट एन्काऊंटर असल्याचा आरोप केला. फेब्रुवारी २०१० मध्ये हे प्रकरण गंभीर झाले, जेव्हा सिंध हायकोर्टाने एसएसपी चौधरी असलम यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले.
रहमानची पत्नी उल्फत यांनी हा बनावट एन्काऊंटर असल्याचा आरोप केला. फेब्रुवारी २०१० मध्ये हे प्रकरण गंभीर झाले, जेव्हा सिंध हायकोर्टाने एसएसपी चौधरी असलम यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
advertisement
10/11
उल्फत यांचा दावा होता की, रहमान आणि त्याच्या तीन साथीदारांना आधी अपहरण करून नंतर ठार मारण्यात आले. हा निर्णय त्या वेळी पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करणारा होता.

11/11
पोलिस तपासात नंतर या एन्काउंटरला समर्थन देण्यात आले असले तरी, रहमान डकैत गुन्हेगार होता की, तो राजकारणी आणि पोलिसांच्या सिस्टमचीच निर्मिती होता, या प्रश्नाचे उत्तर लियारीच्या गल्ल्यांमध्ये आजही दडलेले आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement