पैशांचं ATM म्हणून पिकाची ओळख, 50 वर्षापर्यंत मिळेल उत्पन्न, वर्षाला करा लाखोंची कमाई

Last Updated:

Agriculture News : बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत कमी खर्चात आणि दीर्घकाळ उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत कमी खर्चात आणि दीर्घकाळ उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशाच पिकांपैकी एक म्हणजे आवळा. आवळ्याची शेती ही कमी पाण्यात, विविध हवामानात आणि जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे करता येते. कृषी तज्ज्ञांच्या मते, योग्य लागवड पद्धत आणि शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास आवळ्याच्या शेतीतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो.
advertisement
आवळ्याचे झाड अत्यंत सहनशील असून ते 0 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहज सहन करू शकते. थंडी आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये आवळ्याची वाढ चांगली होते. विशेषतः उष्ण वातावरणात झाडाला चांगला बहर येतो, तर जुलै ते ऑगस्ट या काळात असलेले ओलसर व उबदार वातावरण लहान फळांच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे भारतातील बहुतांश भागात आवळ्याची शेती फायदेशीर ठरू शकते.
advertisement
लागवडीसाठी योग्य तयारी आवश्यक
फळतज्ज्ञ डॉ. एस. के. सिंह यांच्या मते, आवळ्याची शेती काळी, मुरमाड, हलकी किंवा मध्यम प्रतीची जमीन अशा सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. झाडांची लागवड करताना 10 x 10 फूट किंवा 10 x 15 फूट अंतरावर 1 घनमीटर आकाराचा खड्डा खोदावा. हा खड्डा किमान 15 ते 20 दिवस उन्हात मोकळा ठेवावा, जेणेकरून जमिनीतील हानिकारक किडी व जंतू नष्ट होतील.
advertisement
यानंतर खड्ड्यात सुमारे 20 किलो गांडूळ खत, 1 ते 2 किलो निंबोळी खत आणि 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा मिसळावे. कीडनियंत्रणासाठी योग्य प्रमाणात क्लोरोपायरीफॉस डस्ट वापरण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात, विशेषतः मे महिन्यात खड्ड्यांना पाणी देऊन जमिन तयार केल्यानंतर 1520 दिवसांनी रोपांची लागवड करावी.
advertisement
योग्य वाण गरजेचे
‘नरेंद्र’, ‘कंचन’ आणि ‘कृष्णा’ हे आवळ्याचे वाण उत्पादनक्षम मानले जातात. आवळ्यात परागीभवनाचा चांगला परिणाम होण्यासाठी एकाच प्रकारचे झाड न लावता किमान तीन वेगवेगळ्या जाती ठराविक प्रमाणात लावणे फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, एक एकर क्षेत्रात नरेंद्र-7, कृष्णा आणि कंचन या जातींचे संतुलित प्रमाणात रोपण केल्यास उत्पादनात वाढ होते.
advertisement
खत,पाणी आणि निगा राखण्याचे नियोजन
झाड लागवडीनंतर पहिल्या वर्षापासून योग्य खत व्यवस्थापन आवश्यक आहे. सुरुवातीला 5 ते 10 किलो शेणखत आणि आवश्यक प्रमाणात नत्र, स्फुरदपालाश द्यावे. झाडाच्या वयानुसार दरवर्षी खताचे प्रमाण वाढवावे. पाणी व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे असून, उन्हाळ्यात 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. मात्र झाडाला फुलोरा आल्यावर पाणी देणे टाळावे.
advertisement
उत्पादन आणि नफा
कलम केलेली आवळ्याची झाडे तिसऱ्या वर्षापासून फळ देऊ लागतात, तर साधी रोपे 6 ते 8 वर्षांनी उत्पादन देतात. योग्य काळजी घेतल्यास एक आवळ्याचे झाड 50 ते 60 वर्षे नियमित उत्पादन देते. पूर्ण वाढ झालेल्या एका झाडापासून 1 ते 3 क्विंटल फळ मिळू शकते. यामुळे प्रती हेक्टर 15 ते 20 टन उत्पादन मिळून शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळण्याची संधी निर्माण होते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
पैशांचं ATM म्हणून पिकाची ओळख, 50 वर्षापर्यंत मिळेल उत्पन्न, वर्षाला करा लाखोंची कमाई
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement