advertisement

Suhaagrat : लग्नानंतरची पहिली रात्र 'सुहागरात', पण पाकिस्तानात याला काय म्हणतात माहितीये?

Last Updated:
Suhagraat in Pakistan : लग्नानंतरची पहिली रात्र म्हणजे सुहागरात. तसं भारतात जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलात तर भाषेनुसार सुहागरातला आणखी काहीतरी म्हटलं जात असेल. पण पाकिस्तानात याला काय म्हणत असतील याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
1/7
सुहागरात म्हटलं की समोर येतं ते फुलांनी सजवलेला बेड, मेणबत्त्यांनी सजवलेली बेडरूम, बेडवर नवऱ्याची वाट पाहत डोक्यावर घुंघट घेऊन बसलेली नवीन नवरी आणि टेबलवर दुधाचा ग्लास. नवरदेव खोलीत येताच नवरीचा घुंघट काढतो आणि तिचं सुंदर रूप पाहतो. नंतर नवरी त्याच्या हातात दुधाचा ग्लास देते. नंतर ते एकमेकांच्या जवळ येतात, हातात हात, एकमेकांना स्पर्श आणि मग संबंध.

2/7
सामान्यपणे फिल्ममध्ये तरी असंच आपल्याला दाखवलं जातं. त्यामुळे सुहागरात म्हणजे हेच हीच कल्पना आपल्या डोक्यात फिट आहे. पण नवरा-बायकोची लग्नानंतरची पहिली रात्र सुहागरातचा खरा अर्थ काय? तुम्हाला माहिती आहे का?

3/7
खरंतर ‘सुहाग’ आणि ‘रात’ अशा दोन शब्दांचा मिळून ‘सुहागरात’ हा शब्द बनलेला आहे, ‘सुहाग’ म्हणजे विवाहित स्त्रीचं सौभाग्य, तिच्या पतीशी जोडलेलं प्रेम आणि नातं. ‘रात’ अर्थात रात्र. हे दोन्ही शब्द एकत्र केल्यावर ‘सुहागरात’ म्हणजे नवविवाहित जोडप्याची पहिली रात्र होते, जी त्यांच्या वैवाहिक जीवनाची नवी सुरूवात दर्शवते.

4/7
भारतीय परंपरेत सुहागरात केवळ शारीरिक जवळीक यापुरती मर्यादित नाही. त्यामागे खोल सामाजिक, भावनिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. ही रात्र एकमेकांना समजून घेण्याची, संवाद साधण्याची आणि विश्वास निर्माण करण्याची संधी असते. नवरा-बायको म्हणून या नात्याची पहिली पायरी ही सुहागरात असते. प्राचीन ग्रंथांमध्येही या रात्रीचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे.

5/7
सुहागरातशी निगडीत अनेक पारंपरिक रीतिरिवाज आहेत. नववधूला सोळा श्रृंगारात सजवलं जातं. फुलांनी सजवलेली सेज, मिठाई, दूधाचा ग्लास यांसारख्या परंपरा वातावरणात गोडवा आणतात. या लहानशा गोष्टी नवदांपत्याच्या नात्यात प्रेम, आदर आणि आपुलकी निर्माण करतात. कालांतराने या रिती आणि भावना जरी टिकून असल्या तरी आजच्या काळात अनेक नवविवाहित जोडपी या रात्रीबद्दल आपली मते आणि अपेक्षा स्वतःच्या सोयीप्रमाणे ठरवतात. एकमेकांच्या संमतीने, जिथे दोघांनाही सहजता वाटते, तिथेच ही रात्र अधिक अर्थपूर्ण ठरते.

6/7
सुहागरात ही केवळ एक रात्र नाही, ती एक नव्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रेम, समजूत, आणि आयुष्यभर साथ देण्याच्या वचनाची. ही परंपरा जपली जाते कारण ती फक्त शरीराचं नव्हे, तर मनाचं, संस्कृतीचं आणि नात्याचंही प्रतीक आहे.

7/7
भारतात जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलात तर भाषा बदलते आणि तिथल्या भाषेनुसार सुहागरातला आणखी काहीतरी म्हटलं जात असेल. पण पाकिस्तानात याला काय म्हणत असतील याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? पाकिस्तानात सुहागरातला शब-ए-अरूसी असा शब्द आहे. पाकिस्तानी सुहागरातला शब-ए-अरूसी असं म्हणतात. (सर्व फोटो प्रतीकात्मक : AI)

Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement