advertisement

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार झाल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री; शपथविधीवर सुप्रिया सुळेंनी जोडले हात, बारामतीतला VIDEO

Last Updated:

आज सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होत असताना पवार साहेबांना विश्वासात घेतले नाही यावर विचारले असता त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी असे म्हणत बोलणे टाळलं.

News18
News18
बारामती : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण, या शपथविधी सोहळ्यावरून पवार गटामध्ये दोन गट पडले होते. अजित पवार यांच्या गटातील नेते हे मुंबईत होते. तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे बारामतीच थांबले होते. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या. अजितदादांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, ' उद्या रविवारी देशाचं आर्थिक  बजेट सेशन आहे. त्यामुळे दिल्लीला जाणार आहे, त्यासाठी आशा काकींची परवानगी घ्यायला गेले होते. मी सभागृहाची गटनेते असल्याने दिल्लीला जावं लागणार आहे, असं सांगितलं " अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
advertisement
दरम्यान, आज शपथविधी होत असताना पवार साहेबांना विश्वासात घेतले नाही यावर विचारले असता त्यांनी हात जोडून रामकृष्ण हरी असे म्हणत बोलणे टाळलं. आशा काकींच्या तब्येतीबाबत विचारले असता त्या निरुत्तर झाल्या.
रोहित पवार विदीप जाधव यांच्या घरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्या तरडगाव येथील निवासस्थानी रोहित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट दिली, बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये त्यांच्यासोबत असणारे पीएसओ विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. त्यांचे मुळगाव फलटण जवळचे तरडगाव असून आज त्यांच्या निवासस्थानी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी घरातील नातेवाईकांची सांत्वन पर भेट घेतली. यावेळी अजित दादांसोबतच्या अनेक गोष्टींना घरातील नातेवाईकांनी उजाळा दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार झाल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री; शपथविधीवर सुप्रिया सुळेंनी जोडले हात, बारामतीतला VIDEO
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement