advertisement

White Hair : सेल्युलर एजिंग म्हणजे काय ? सेल्युलर एजिंगमुळे प्रकृतीवर काय परिणाम होतो ?

Last Updated:

केस पांढरे होण्याची वेळ मुख्यत्वे जनुकांवर अवलंबून असते. म्हणूनच केस पांढरे होण्याचं वय वेगवेगळ्या लोकांमधे आणि वेगवेगळ्या वंशांमधे बदलू शकतं. काहींचे केस वयाच्या तिसाव्या वर्षी पांढरे होऊ लागतात, तर काहींचे केस पन्नाशीपर्यंत काळे राहतात.

News18
News18
मुंबई : वयानुसार केस पांढरे होणं वेगळं. पण सध्या बदलती जीवनशैली, वाढलेले ताण, आहार आणि पर्यावरणीय परिणामांमुळे केस तारुण्यातच किंवा त्याही आधी केस पांढरे होतायत. आपल्या केसांचा रंग मेलेनिन नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य निश्चित करतं.
शास्त्रज्ञांच्या मते, मेलेनिन एखाद्या व्यक्तीचे केस काळे किंवा तपकिरी, पातळ किंवा जाड हे ठरवतं. हे रंगद्रव्य केसांच्या कूपांमधील विशेष पेशींद्वारे तयार केलं जातं. जोपर्यंत या पेशी योग्यरित्या कार्य करत राहतात तोपर्यंत केसांचा नैसर्गिक रंग अबाधित राहतो, पण जसजसं वय वाढतं तसतसं या पेशी कमकुवत होतात आणि हळूहळू मेलेनिन तयार करणं थांबवतात.
advertisement
यामुळे केसांचा रंग फिकट होऊ लागतो आणि ते राखाडी किंवा पांढरे दिसू लागतात. या संपूर्ण प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या सेल्युलर एजिंग म्हणतात, म्हणजेच शरीराच्या पेशी कालांतरानं त्यांची कार्यक्षमता गमावू लागतात. सुरुवातीला, काही केस राखाडी होतात, पण नंतर त्यांची संख्या हळूहळू वाढते.
advertisement
वयाव्यतिरिक्त, अनुवंशशास्त्र देखील महत्त्वाची भूमिका बजावतं. आई किंवा वडील किंवा आजी-आजोबांचे केस लहान वयातच पांढरे झाले असतील तर पुढच्या पिढीमधेही तसंच होण्याची शक्यता देखील वाढते.
शास्त्रज्ञांच्या मते, केस पांढरे होण्याची वेळ मुख्यत्वे जनुकांवर अवलंबून असते. म्हणूनच केस पांढरे होण्याचं वय वेगवेगळ्या लोकांमधे आणि वेगवेगळ्या वंशांमधे बदलू शकतं. काहींचे केस वयाच्या तिसाव्या वर्षी पांढरे होऊ लागतात, तर काहींचे केस पन्नाशीपर्यंत काळे राहतात.
advertisement
अपुरं पोषण हे आणखी एक प्रमुख कारण मानलं जातं. शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी जीवनसत्त्वं आणि खनिजांची आवश्यकता असते. जीवनसत्त्व बी12, लोह, तांबं आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. याचा परिणाम रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींवर होतो आणि केस अकाली पांढरे होतात. म्हणूनच, डॉक्टर हिरव्या भाज्या, फळं, डाळी, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेण्याची शिफारस करतात.
advertisement
दीर्घकालीन मानसिक ताण शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतो. जास्त ताणामुळे रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींचं नुकसान होऊ शकतं.
याव्यतिरिक्त, चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी केसांच्या आरोग्यावर देखील परिणाम करतात. झोपेचा अभाव, धूम्रपान, जास्त मद्यपान आणि फास्ट फूडवर अवलंबून राहणं यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो. यामुळे पेशी लवकर वयस्कर होतात आणि केसांच्या रंगावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, निरोगी जीवनशैलीमुळे हा परिणाम काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
White Hair : सेल्युलर एजिंग म्हणजे काय ? सेल्युलर एजिंगमुळे प्रकृतीवर काय परिणाम होतो ?
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement