Health Tips : पदार्थाच्या स्वादापासून शरीराच्या अंतर्गत दुरुस्तीपर्यंत, गुणकारी तुपाचे असंख्य फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आतड्यांतील बद्धकोष्ठता दूर करण्यापासून ते हाडं मजबूत करण्यापर्यंत, तुपाचा उपयोग होतो. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तुपाचा उपयोग केला जातो. तुपामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं. पाहूयात शरीरासाठीची संजीवनी तुपाचे फायदे.
मुंबई : तूप म्हणजे घराघरांतला आवडता पदार्थ आणि तब्येतीच्या अनेक गोष्टींसाठी गुणकारी वंगण. आयुर्वेदात शुद्ध तुपाला 'अमृत' असं म्हणतात.
आतड्यांतील बद्धकोष्ठता दूर करण्यापासून ते हाडं मजबूत करण्यापर्यंत, तुपाचा उपयोग होतो. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तुपाचा उपयोग केला जातो. तुपामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं.
तुपामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत होते. तूप योग्य प्रमाणात वापरल्यानं, त्वचा निरोगी राहते. आयुर्वेदात, तूप थंडगार, गुळगुळीत रसायन मानलं जातं. तूप त्वचेच्या आजारांचं मुख्य कारण असलेल्या वात आणि कफ यांचं संतुलन करण्यासाठीही देखील मदत करतं.
advertisement
तुपामुळे त्वचेचं खोलवर पोषण होतं आणि चेहऱ्यावरील घाण आणि मृत पेशी काढून टाकण्यास तुपामुळे मदत होते. महत्वाची गोष्ट म्हणजे तुपात वृद्धत्व रोखण्याची क्षमता असते म्हणजेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तूप खाणं फायदेशीर ठरू शकतं.
देशी तुपामुळे त्वचा मऊ राहते आणि हिवाळ्यात कोरडेपणापासून त्वचेचं संरक्षण होतं. तूप कसं खावं यासाठी काही खबरदारी घेणं महत्वाचं आहे. प्रथम, तूप कधी आणि कसं वापरायचं ते समजून घेऊया.
advertisement
तूप आहारात असू दे पण मर्यादित प्रमाणात. आहारातल्या विविध पदार्थांमधे तूप असू दे तसंच रात्री चेहऱ्याच्या कोरड्या भागांवर तूप लावता येतं.
तूप वापरताना कोणती खबरदारी घ्यायची हे समजून घेऊया. पचनशक्ती खराब असेल तर तूप मर्यादित प्रमाणात वापरा. त्वचा तेलकट असेल तर तूप कमी प्रमाणात वापरा. कारण त्यामुळे मुरुमं आणि पुरळ येऊ शकतं.
advertisement
हृदयरोग आणि मधुमेह असलेल्यांनीही तूप खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयरोग्यांना कमी चरबी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, जे हृदयरोग असलेल्यांसाठी धोकादायक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 10:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : पदार्थाच्या स्वादापासून शरीराच्या अंतर्गत दुरुस्तीपर्यंत, गुणकारी तुपाचे असंख्य फायदे










