advertisement

Obesity : स्थूलतेमुळे शरीरासोबतच मेंदूवरही होतो परिणाम, वाचा नवीन संशोधनातले महत्त्वाचे खुलासे

Last Updated:

स्वादुपिंडात चरबी जमा होण्याचे परिणाम मेंदूवर होतात. काही जण बाहेरून बारीक दिसतात पण आतून फॅटी असतील तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे मेंदूचं वृद्धत्व वेगानं वाढू शकतं असं संशोधनात दिसून आलं आहे. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते, विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढू शकतो.

News18
News18
मुंबई : लठ्ठपणा म्हणजे वाढलेलं वजन. लठ्ठपणामुळे, शरीरावर आणि मनावर परिणाम जास्त होईल असं मानलं जात होतं पण नुकत्याच एका अभ्यासानुसार, मेंदूवर लठ्ठपणाचा परिणाम केवळ शरीरात किती चरबी आहे यावरून ठरवला जात नाही, तर शरीराच्या कोणत्या भागात चरबी जमा झाली आहे याच्याशी ते अधिक संबंधित आहे.
स्वादुपिंडात चरबी जमा होण्याचे परिणाम मेंदूवर होतात. काही जण बाहेरून बारीक दिसतात पण आतून फॅटी असतील तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे मेंदूचं वृद्धत्व वेगानं वाढू शकतं असं संशोधनात दिसून आलं आहे. यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते, विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढू शकतो.
advertisement
पोटात साठलेली चरबी (व्हिसरल फॅट) मानसिक आरोग्याला हानी पोहोचवते असं आधीच्या संशोधनातून दिसून आलं. पण नवीन अभ्यासानुसार, सर्व प्रकारच्या चरबीमुळे तसंच आणि तितक्याच प्रमाणात धोका निर्माण होईल असं नाही.
या संशोधनात, शरीराच्या वेगवेगळ्या भागांमधे चरबीचे साठे मोजण्यासाठी एमआरआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामुळे डेटा-आधारित वर्गीकरण तयार झालं. मेंदूसाठी कोणते चरबीचे नमुने अधिक हानिकारक आहेत हे यावरुन दिसून आलं.
advertisement
या संशोधनात यूके बायोबँकमधील सुमारे 26,000 जणांच्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात मेडिकल वैद्यकीय इमेजिंग, शारीरिक मोजमाप, जीवनशैली, रोगाचा इतिहास आणि बायोमार्कर यांचा समावेश होता. या सर्व माहितीची मेंदूच्या आरोग्याशी तुलना करण्यात आली.
स्वादुपिंडातील साठलेली हा आरोग्यासाठी न दिसणारा मोठा धोका असल्याचं संशोधनात आढळून आलं.  ज्यांची चरबी प्रामुख्यानं स्वादुपिंडात साठवली जात होती, त्यांच्यामधे चरबीचं प्रमाण तीस टक्क्यांपर्यंत आढळून आलं. हे प्रमाण इतर चरबीच्या नमुन्यांपेक्षा दोन ते तीन पट जास्त होतं. या लोकांमधे यकृतातील चरबी जास्त नव्हती.
advertisement
संशोधकांच्या मते, डॉक्टर सहसा फॅटी लिव्हरवर जास्त लक्ष केंद्रित करतात, पण मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, स्वादुपिंडात जमा होणारी चरबी अधिक धोकादायक ठरू शकते.
स्किनी फॅट असणाऱ्यांना छुपा धोका - स्किनी फॅट म्हणजेच पातळ चरबी असलेले लोक बाहेरून जास्त वजनदार दिसत नाहीत, पण त्यांच्या शरीरात चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि स्नायूंचं प्रमाण कमी असतं.
advertisement
या व्यक्तींच्या पोटाभोवती जास्त चरबी असते, तर यकृत आणि स्वादुपिंडात कमी असते. त्यांचा बीएमआय फार जास्त नसतो, म्हणून ते स्वतःला सुरक्षित मानतात. पण, प्रत्यक्षात, त्यांचं वजन आणि स्नायूंचं प्रमाण बिघडलेले आहे, विशेषतः पुरुषांमधे, हे मानसिक आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतं.
या अभ्यासानुसार, लठ्ठपणा केवळ वजन किंवा बीएमआयनं मोजता येत नाही. मेंदूच्या आरोग्यासाठी चरबी कुठे साठवली जाते हे खूप महत्वाचं आहे. म्हणून, तंदुरुस्त राहणं म्हणजे फक्त सडपातळ दिसणं नव्हे तर शरीरातील चरबी आणि स्नायूंचं योग्य संतुलन राखणं देखील गरजेचं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Obesity : स्थूलतेमुळे शरीरासोबतच मेंदूवरही होतो परिणाम, वाचा नवीन संशोधनातले महत्त्वाचे खुलासे
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement