Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! फ्री मिळेल 4 हजार रुपयांचा Adobe Express प्रीमियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
एअरटेल Adobe च्या भागीदारीनुसार Airtel चे ग्राहक वर्षभरासाठी एडोब एक्सप्रेस प्रीमियम फ्री वापरु शकतात.
एअरटेलने Adobe सह भागीदारी केली आहे. या भागीदारी दरम्यान Airtel चे ग्राहक पूर्ण एक वर्षासाठी एडोब एक्सप्रेस प्रीमियमचा फ्री उपयोग करु शकतात. या सब्सक्रिप्शनची किंमत आणि सामान्यतः वार्षिक जवळपास 4 हजार रुपये असते. पण आता एअरटेलच्या डिजिटल बेनिफिट्स अंतर्गत लाखो यूझर्सला ही सुविधा फ्रीमध्ये प्रदान केली जात आहे. चला एअरटेल आणि Adobe च्या भागीदारी अंतर्गत मिळणाऱ्या Adobe Express लाभांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
फ्री मेंबरशिप कशी अॅक्टिव्ह करावी : Adobe Express प्रीमियम बहुतेक एअरटेल ग्राहकांना मोफत उपलब्ध आहे. एअरटेल प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल ग्राहक, एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर ब्रॉडबँड यूझर आणि एअरटेल डिजिटल टीव्ही ग्राहक या फायद्याचा लाभ घेऊ शकतात. एकदा अॅक्टिव्ह झाल्यानंतर, अ‍ॅडोब एक्सप्रेस प्रीमियम मेंबरशिप 12 महिन्यांसाठी वैध असते.
advertisement
Adobe Express Premium काय आहे? : Adobe Express अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे, जे कॉम्प्लेक्स डिझाइनच्या सॉफ्टवेयर न शिकता प्रोफेशनल डिझाइन बनवू इच्छितात. एडोब एक्सप्रेस यूझर्सला काही मिनिटांत शानदार सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ पोस्टर, प्रेझेंटेशन, फ्लायर्ससह बरंच काही बनवण्यात मदत करते. पहिलेच बनवलेल्या टेम्प्लेट आणि आर्टिफिशिय इंटेलिजेन्स सॉफ्टवेयरच्या मदतीने कोणीही प्रोफेशनल दिसणारा कंटेंट तयार करु शकतो. जो कोणत्याही प्रोफेशनलच्या कामाप्रमाणे दिसतो.
advertisement
advertisement








