Mumbai Local: रुळावर सगळीकडे धूरच धूर, मध्य रेल्वेवर मोठी घटना, कळवा-ठाणे स्थानकातला पहिला VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
ऐन संध्याकाळी मध्य रेल्वेवर कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर आग लागल्याची घटना समोर आली आहे.
ठाणे : नेहमी गर्दीने ओसांडून वाहणारी मध्य रेल्वेवर या ना त्या कारणामुळे नेहमी गोंधळ पाहण्यास मिळत असतो. अशातच ऐन संध्याकाळी मध्य रेल्वेवर कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळावर आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे रुळाखालून धुराचे लोट पाहण्यास मिळाले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर ऐन संध्याकाळी कळवा ते ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे रुळांमधून धूर येत असल्याचं लक्षात आलं. बघता बघता धुराने संपूर्ण परिसर व्यापून गेला होता. त्यामुळे रेल्वे रुळावर धूरच धूर पाहण्यास मिळत होता.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली असता नाल्यात कचऱ्याला मोठी लागली होती. रुळाच्या खाली असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. सगळीकडे धूर पसरल्यामुळे समोर काही दिसेना झालं होतं. फलाट क्रमांक एक आणि दोनमध्ये असणाऱ्या नाल्याच्या मधील कचऱ्याला आग लागल्याने रेल्वेचा खोळंबा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
advertisement
घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल
या आगीच्या घटनेमुळे कळवा येथून ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या आणि ठाण्याहून कल्याण डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहे. सुदैवाने आग मोठी नव्हती, त्यामुळे यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, ही आग कुणी आणि का लावली, याचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीसही दाखल झाले.
advertisement
लोकल गाड्या थांबल्या
रेल्वे रुळाच्या खाली असलेल्या पुलामध्ये साचलेल्या कचऱ्याला आग लावण्यात आली होती. कचरा अर्धवट जळाल्यामुळे सगळीकडे धूर पसरला होता. धूर इतका वाढला होता की समोर दिसेना झालं होतं. त्यामुळे काही लोकल या थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक ही १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 6:45 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Mumbai Local: रुळावर सगळीकडे धूरच धूर, मध्य रेल्वेवर मोठी घटना, कळवा-ठाणे स्थानकातला पहिला VIDEO






