बॉक्स ऑफिसवर लावली आग, पण Netflix वर येताच 'धुरंधर'चा खेळ खंडोबा! OTT रिलीजच्या पहिल्याच दिवशी ट्रोल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar OTT Release: अख्ख्या देशाला वेड लावणारा रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट 30 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना अपेक्षा होती की, ओटीटीवर या चित्रपटाचा अनकट आणि रॉ अवतार पाहायला मिळेल. पण घडलं उलटंच.
मुंबई : बॉक्स ऑफिसवर १३०० कोटींहून अधिक गल्ला जमवून अख्ख्या देशाला वेड लावणारा रणवीर सिंगचा 'धुरंधर' चित्रपट 30 जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर प्रेक्षकांना अपेक्षा होती की, घरबसल्या ओटीटीवर या चित्रपटाचा अनकट आणि रॉ अवतार पाहायला मिळेल. पण घडलं उलटंच.
advertisement
advertisement
थिएटरमध्ये जेव्हा 'धुरंधर' प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याचा एकूण वेळ ३ तास ३४ मिनिटे इतका होता. मात्र, नेटफ्लिक्सवर हा चित्रपट ३ तास २५ मिनिटांचाच दिसत आहे. म्हणजेच जवळपास ९ ते १० मिनिटांचा हाय-व्होल्टेज ड्रामा गायब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला 'A' प्रमाणपत्र मिळालेले असतानाही ओटीटीवर कात्री का चालवली? असा सवाल चाहते विचारत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
'पिंकविला'च्या वृत्तानुसार, दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्मात्यांनी नेटफ्लिक्सला अनकट वर्जन दिले होते. मात्र, नेटफ्लिक्सच्या स्वतःच्या काही नियमांमुळे त्यांनी चित्रपटात ही कपात केली आहे. केवळ लांबीत कपातच नाही, तर काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कलर ग्रेडिंग आणि व्हिज्युअल क्वालिटीवरही नाराजी व्यक्त केली आहे. थिएटरमध्ये दिसलेला तो भव्य फील लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर हरवल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
advertisement








