advertisement

प्रसिद्ध अभिनेत्रीने कस्टम अधिकाऱ्यालाच गंडवलं, 11.5 कोटींचा चुना लावून फरार, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
एखाद्या चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल असा फसवणुकीचा थरार सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरला आहे. ३०० कोटींच्या कॅशचं आमिष दाखवून एका अनुभवी कस्टम क्लिअरन्स एजंटला तब्बल साडे अकरा कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.
1/9
मुंबई : एखाद्या चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल असा फसवणुकीचा थरार सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरला आहे. ३०० कोटींच्या कॅशचं आमिष दाखवून एका अनुभवी कस्टम क्लिअरन्स एजंटला तब्बल साडे अकरा कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे.

2/9
धक्कादायक बाब म्हणजे, या हाय-प्रोफाईल फसवणुकीत भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा अवस्थी आणि तिच्या पतीवर ठपका ठेवण्यात आला आहे. घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाची व्याप्ती पाहता याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.

3/9
अंधेरीतील साकिनाका येथे राहणारे तक्रारदार हितेश कांतीलाल अजमेरा हे व्यवसायाने कस्टम क्लिअरन्स एजंट आहेत. २०२४ च्या सुरुवातीला त्यांच्या एका कर्मचाऱ्यामार्फत त्यांची ओळख शांतिलाल पटेल नावाच्या व्यक्तीशी झाली.

4/9
पटेलने गोव्यात आपली जमीन असल्याचे सांगून गुंतवणुकीचे आमिष दाखवले. इथूनच या फसवणुकीच्या प्रकरणाची सुरूवात झाली. पुढे पटेलने अजमेरा यांची ओळख विवेककुमार सिन्हा उर्फ अभिषेक सिंह चौहान आणि त्याची पत्नी आकांक्षा अवस्थी यांच्याशी करून दिली.

5/9
विवेक सिन्हा आणि आकांक्षा यांनी अजमेरांना एका अजब कहाणीवर विश्वास ठेवायला लावलं. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथील एका गोदामात ३०० कोटींची रोख रक्कम पेट्यांमध्ये बंद असल्याचा दावा त्यांनी केला.

6/9
 "काही कायदेशीर अडचणी आणि मालमत्तेची देणी थकल्यामुळे ही रक्कम अडकली आहे, ती सोडवण्यासाठी पैशांची गरज आहे," असं त्यांनी अजमेरांना सांगितलं. बदल्यात, अजमेरांना २०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचं गाजर दाखवण्यात आलं.

7/9
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी नोटराईज्ड कागदपत्रंही दाखवली. मार्च २०२४ मध्ये अजमेरांनी ५० लाख दिले. त्यानंतर त्यांना चक्क पाटण्याला नेण्यात आलं. तिथे एका व्यक्तीची ओळख गोदाम मालक म्हणून करून देण्यात आली, ज्याने पैसे सोडवण्यासाठी ११ कोटींची मागणी केली.

8/9
अजमेरांनी टप्प्याटप्प्याने एकूण ११.५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष रक्कम घेण्याची वेळ आली, तेव्हा विवेक सिन्हा काही बहाणा करून बाहेर पडला आणि त्याचा फोन बंद झाला. त्यानंतर आकांक्षा अवस्थी आणि तिचे साथीदारही गायब झाले.

9/9
स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अजमेरांनी पोलिसांत धाव घेतली. विश्वासघात, फसवणूक आणि बनावट कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकांक्षा अवस्थी ही भोजपुरी अभिनेत्री असल्यामुळे या प्रकरणाला ग्लॅमरची किनार लाभली आहे. पोलीस आता या अभिनेत्रीचा आणि तिच्या पतीचा शोध घेत असून, बिहारमधील त्या कथित ३०० कोटींच्या रकमेचीही चौकशी करत आहेत.

Gold Silver ETF Crash: काही तासांत करोडोंचा चुराडा, सोनं-चांदी ईटीएफमध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
काही तासांत करोडोंचा चुराडा, Gold-Silver ETF मध्ये भूकंप, आता पुढं काय होणार?
  • Gold Silver ETF गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार हा दिवस धक्कादायक ठरला

  • गोल्ड-सिलव्हर ईटीएफमध्ये १४ टक्क्यांची घसरण दिसून आली.

  • अचानक झालेल्या घसरणीने गुंतवणूकदारांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

View All
advertisement