Pre Workout Food : रिकाम्या पोटी जिमला जाणं ठरू शकतं घातक! वर्कआउटपूर्वी खा 'हे' 5 पदार्थ, येणार नाही थकवा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Pre workout foods for energy : अनेक जण सकाळी-सकाळी जिमला पोहोचतात आणि रिकाम्या पोटी वर्कआउट सुरू करतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, रिकाम्या पोटी वर्कआउट केल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि स्नायूंवर ताण वाढतो.
मुंबई : निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी जिमला जाण्याचा ट्रेंड वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक जिममध्ये जाऊन वर्कआउट करायला पसंत करतात. बहुतांश जिममध्ये सकाळी आणि संध्याकाळीही गर्दीचे वातावरण पाहायला मिळते. अनेक जण सकाळी-सकाळी जिमला पोहोचतात आणि रिकाम्या पोटी वर्कआउट सुरू करतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, रिकाम्या पोटी वर्कआउट केल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि स्नायूंवर ताण वाढतो. यामुळे लवकर थकवा येतो, ब्लड शुगर लेव्हल कमी होऊ शकते आणि कधी-कधी चक्करही येऊ शकते. जिमला जाण्यापूर्वी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
नोएडाच्या डाएट मंत्रा क्लिनिकमधील डायटिशियन कामिनी सिन्हा यांनी News18 ला सांगितले की, वर्कआउटपूर्वी योग्य नाश्ता करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि व्यायामादरम्यान स्नायू योग्य पद्धतीने काम करतात. रिकाम्या पोटी जिम केल्याने बॉडी फॅट नक्कीच बर्न होते, पण स्नायू तुटण्याचा धोका देखील वाढतो. याशिवाय दीर्घकाळ रिकाम्या पोटी वर्कआउट केल्यास हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरवरही परिणाम होऊ शकतो.
advertisement
आता प्रश्न असा आहे की, वर्कआउटपूर्वी काय खावे? डायटिशियनने सांगितले की, वर्कआउट करण्यापूर्वी कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त हलका नाश्ता हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे केवळ ऊर्जा मिळत नाही, तर स्नायूंना होणारे नुकसानही टाळता येते. यामध्ये खूप जड आणि तेलकट अन्न टाळावे. कारण त्यामुळे पचनावर ताण येऊ शकतो आणि व्यायामादरम्यान आकडी येऊ शकते किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
advertisement
वर्कआउटपूर्वी केळी, ओट्स, दलिया, शेंगदाणे, बदाम आणि अंडे खाऊ शकता. केळी त्वरित ऊर्जा देतात आणि स्नायूंचा थकवा कमी करतात. ओट्स आणि दलिया दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात. शेंगदाणे किंवा बदाम प्रोटीन आणि हेल्दी फॅट देतात, तर उकडलेले किंवा सॉफ्ट बॉईल अंडे स्नायू मजबूत करण्यास मदत करते.
एक्सपर्टने सांगितले की, वर्कआउटच्या 30 ते 45 मिनिटे आधी या अन्नपदार्थांचे सेवन करावे, जेणेकरून शरीराला पचण्यासाठी वेळ मिळेल. यामुळे व्यायामादरम्यान जडपणा किंवा आकडीसारख्या तक्रारी येत नाहीत. यासोबतच पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे, जेणेकरून शरीर हायड्रेट राहील आणि थकवा कमी होईल. फिटनेससाठी व्यायाम करणे चांगली गोष्ट आहे, पण शरीराला योग्य तयारी आणि पोषण देणे तितकेच महत्त्वाचे आहे. चूक केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 4:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pre Workout Food : रिकाम्या पोटी जिमला जाणं ठरू शकतं घातक! वर्कआउटपूर्वी खा 'हे' 5 पदार्थ, येणार नाही थकवा..








