advertisement

सोन्या-चांदीच्या भावात 'महाभूकंप'; दरात इतिहासातील सर्वात मोठी घसरण, लाखात कमावणाऱ्यांचे कोट्यवधी बुडाले

Last Updated:

Gold And Silver Prices: विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोने-चांदीच्या किमतींना अचानक मोठा झटका बसला आहे. MCX वर चांदी आणि सोन्यात झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

News18
News18
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोने-चांदीच्या किमतींना शुक्रवारी अचानक जोरदार धक्का बसला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरात इतिहासातील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदली गेली. काही वेळासाठी 4 लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता दिसणारी चांदी थेट 3.34 लाख रुपये प्रतिकिलोच्या आसपास घसरली.
शुक्रवारी दुपारी सुमारे 3.40 वाजता MCX वर चांदीचा वायदा भाव तब्बल 66 हजार रुपयांनी म्हणजेच जवळपास 16.70 टक्क्यांनी घसरला. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय घसरण मानली जात आहे. याचवेळी सोन्याच्याही किमतींमध्ये मोठी पडझड झाली. MCX वर सोनं सुमारे 7 टक्क्यांनी घसरत 1.58 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आलं.
विशेष म्हणजे अवघ्या एक दिवस आधीच चांदी 4 लाख रुपयांच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच मौल्यवान धातूंवर विक्रीचा दबाव दिसू लागला. या दबावाचा सर्वाधिक फटका चांदीला बसला, तर सोन्यालाही मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. दुपारपर्यंत सोन्याचा दर 10,954 रुपयांनी घसरून 1,58,449 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. सोन्यात एका दिवसात सुमारे 6.5 टक्क्यांची घसरण नोंदली गेली.
advertisement
मग आधी सोने एवढं महाग का झालं होतं?
जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरात प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. यामागे जागतिक पातळीवर वाढलेली मागणी हे मुख्य कारण आहे. आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी क्रिप्टोपासून ते सेंट्रल बँकांपर्यंत सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहायला सुरुवात केली.
या वातावरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळेही तणाव वाढला. इराणसोबतच्या अणुकराराबाबत अमेरिकेने दबाव वाढवला असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिका आणि इस्रायलविरोधात कारवाईची धमकी दिली आहे. त्यामुळे आणखी एका संघर्षाची शक्यता निर्माण झाली आणि सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहिलं गेलं.
advertisement
याशिवाय क्रिप्टो क्षेत्रातील मोठी कंपनी Tether च्या CEO यांनी त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओपैकी 10 ते 15 टक्के हिस्सा सोन्यात गुंतवण्याची योजना जाहीर केली होती. कंपनीची रणनीती सुमारे 10 टक्के गुंतवणूक बिटकॉइनमध्ये आणि 10 ते 15 टक्के सोन्यात करण्याची आहे. या सगळ्या घडामोडींमुळे सोन्याच्या दरांना जोरदार आधार मिळाला होता.
मात्र आता नफेखोरी आणि जागतिक संकेतांमुळे सोने-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
सोन्या-चांदीच्या भावात 'महाभूकंप'; दरात इतिहासातील सर्वात मोठी घसरण, लाखात कमावणाऱ्यांचे कोट्यवधी बुडाले
Next Article
advertisement
सोन्या-चांदीच्या भावात 'महाभूकंप'; दरात इतिहासातील सर्वात मोठी घसरण, लाखात कमावणाऱ्यांचे कोट्यवधी बुडाले
सोन्या-चांदीच्या भावात महाभूकंप;दरात इतिहासातील सर्वात मोठी घसरण,कोट्यवधी बुडाले
  • सोन्या-चांदीला जबरदस्त झटका

  • इतिहासातील सर्वात मोठी घसरण

  • चांदी 16% कोसळली, सोनंही 7% घसरलं

View All
advertisement